Dhananjay Munde Reaction on rajesaheb deshmukh statement: अजित पवार यांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी झी 24 तासच्या जाहीर सभेत हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. बीड जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार निवडून आणणं ही आमची सर्वांची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. बीडमधलं राजकारण बदललंय. जरांगे फॅक्टर आलाय. जातीपातीचं राजकारणं आलंय. या सर्वावर त्यांनी भाष्य केलं.
लोकसभेनंतर निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललाय. बीड जिल्ह्याने आतापर्यंत कर्तुत्ववान माणसाला संधी दिली होती. पण आता यात जातीपातीचं राजकारण आलं आणि लोकसभेत याचा परिणाम दिसल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. पण यावेळेस योग्य मतदान होईल. जो चांगल काम करेल त्याला जनता मतदान करेल असे ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत लग्न हा प्रचाराचा मुद्दा बनत चालला आहे. तुमच्या विरोधकांनी आश्वासन दिलंय, की मी निवडून आलो तर सिंगल मुलांच लग्न लावून देईन. सिंगल मुलांची संख्या वाढली असेल तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? असा प्रश्न धनंजय मुंडे यांना विचारण्यात आला.
यावर धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले,'मला यावर बोलायच नाही. हा प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो का? मला निवडून द्या मी तुमचं लग्न लावून देईन, असं ते म्हणाले. बरं..लग्न लावून द्याल पण मुली? तिकीट मिळायच्या आधी त्यांचे नेते राहुल गांधी होते, असे ते म्हणाले. राजेसाहेबांच्या या वक्तव्याची त्यांचे प्रतिस्पर्धी धनंजय मुंडेंनी मात्र चांगलीच फिरकी घेतली. राजेसाहेब ज्या काँग्रेस पक्षात होते त्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्याचं अजून लग्न झालेलं नाहीय आणि ते काय आमच्या मुलांची लग्न लावून देणार, असं धनंजय मुंडेंनी याआधी म्हटलं होतं.
परळीत लग्न हा निवडणुकीचा मुद्दा झालाय. इथं महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेबांनी अनेक लग्नाळू मुलांच्या आवडत्या विषयालाच हात घातलाय. आमदार म्हणून निवडून दिलं तर सगळ्या पोरांची लग्न लावून देण्याचं आश्वासन राजेसाहेब देशमुखांनी दिलंय. हाताला काम नाही...त्यामुळे पोरीचा बाप पोरगी देत नाही.अशा लग्नाळू मतदारांची संख्या परळीत लक्षणीय आहे. या सगळ्या लग्नाळू मुलांचं पितृत्व राजेसाहेब देखमुखांनी घेतलंय. आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून टाकू, असा शब्दच राजेसाहेबांनी दिलाय.
निवडणुका आल्या की आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. राजकीय चिखलफेक सुरू होते. मात्र परळीचे उमेदवार राजेसाहेब देशमुखांनी समस्त लग्नाळू मुलांच्या मुद्याला राजकारणाच्या केंद्रस्थानी आणलंय. हा मुद्दा वरकरणी गंमतीचा वाटत असला तरी तितकाच गंभीरही आहे. ग्रामीण भागातल्या विशेषत: शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत. नोकरी नसणा-या मुलांची लग्नं होत नाही आहेत. त्यामुळे राजेसाहेब देशमुखांच्या मागे समस्त लग्नाळू मंडळी उभी राहणार का, हे निकालानंतरच समजणार आहे.