मुंबई : मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय काय म्हणणाऱ्या आरजे मलिष्काच्या घराची बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे. बांद्रा पश्चिम, पालीनाका येथील सनराईज बिल्डींगमधील मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
पण बीएमसीनं ही कारवाई सूडबुद्धीनं केल्याचा आरोप होत आहे. मलिष्कानं धाडसानं मुंबईकरांच्या समस्या गाण्यातून मांडल्या. तिच्या घरी महापालिका कर्मचा-यांनी जाणं आणि डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचं सांगणं योग्य नाही. महापालिका आयुक्तांनी यात लक्ष घालावं, असं ट्वीट मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी केलंय.
It is brave of @mymalishka 2 come out comfort zone and apply her creativity 2 express Mumbai's problems.
Protected under freedom of speech.— ashish shelar (@ShelarAshish) July 19, 2017
Completely unfair that Authorities turn up at @mymalishka's house and find faults. Spoke to BMC Commissioner & ward officers to bring peace.
— ashish shelar (@ShelarAshish) July 19, 2017
मुंबईकरांना रोज ज्या गंभीर विषयांवर "सामना" करावा लागतो त्यावर व्यंगात्मक "मार्मिक" टीका मलिष्का यांनी केली.त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र आहे
— ashish shelar (@ShelarAshish) July 19, 2017
आशिष शेलार यांच्याबरोबरच काँग्रेस आमदार नितेश राणेही मलिष्काच्या मदतीला धावलेत. मलिष्का तू एकटी नाहीस. आम्ही आहोत तुझ्याबरोबर... वाघोबा करतो म्याव म्याव, आम्ही आणि मलिष्का बहिण भाव... अशी ट्वीटोळी नितेश राणेंनी केली आहे.
मलिष्का तु एकटी नाही..
आम्ही आहोत तुझ्या बरोबर..वाघोबा करतो म्याव म्याव..
आम्ही आणि मलिष्का बहीण भाव!!— nitesh rane (@NiteshNRane) July 19, 2017