Ayodhya Ram Mandir Multibagger Stock: तुम्ही शेअर मार्केटच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा विचार करत असाल आणि एखाद्या मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधात असाल तर ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायलाच हवी अशी आहे. शेअर बाजारामध्ये योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्हाला खणखणीत रिटर्नस मिळतात. असे अनेक शेअर्स आहेत ज्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदार मालामाल झालेत. अशाच एका शेअरबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्याचं कनेक्शन अयोध्येतील राम मंदिराशी आहे.
या शेअरचं नाव आहे प्रवेग लिमिटेड. आता या कंपनीचं अयोध्येमधील राम मंदिराशी काय कनेक्शन आहे असा प्रश्न पडला असेल तर या कंपनीने अयोध्येमध्ये होत असलेल्या 22 जानेवारीच्या उद्घाटन समारंभासाठी अयोध्येत येणाऱ्या खास पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी टेंट सिटी उभी केली आहे. त्यामुळेच या कंपनीच्या शेअर्सची मागणी वाढली आहे.
केवळ अयोध्याच नाही तर भारतामधील वेगवेगळ्या शहारंमध्ये टेंट सिटी उभी करणाऱ्या प्रवेग लमिटेडच्या शेअर्सची किंमत वर्षभरामध्ये 250 रुपयांनी वाढली आहे. हा शेअर आता 750 वर पोहोचला आहे. म्हणजेच या कंपनीने एका वर्षात जवळपास तिप्पट रिटर्न दिला आहे. कंपनी सध्या अयोध्येमध्ये राम जन्मभूमीजवळ टेंट सिटी उभारल्याने चर्चेत आहे. अयोध्येबरोबरच प्रवेग लिमिटेड वाराणसीमधील काशी विश्वनाथ, स्टॅच्यू ऑफ यूनिटीसारख्या ठिकाणीही टेंट सिटी उभारल्या आहेत. कच्छमध्ये होणाऱ्या रण उत्सव सोहळ्यामध्येही पर्यटकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय प्रवेग लिमिटेड कंपनीकडून उभारण्यात येणाऱ्या टेंटमध्येच केली जाते.
कंपनीला नुकतीच लक्षद्वीपमधील पर्यटन विभागाकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. कंपनीने केंद्र शासित प्रदेश असलेल्या अगत्ती बेटावर रेस्तराँ, क्लोकरुम, चेजिंग रुम आण् अन्य सुविधांबरोबरच एकूण 50 आलिशान टेंटची निर्मिती, नियोजन, व्यवस्थापन आणि देखरेख करण्याचं काम मिळालं आहे. हा करार 3 वर्षांसाठी झाला आहे. तसेच हा करार पुढे 2 वर्षांसाठी वाढवला जाण्याची दाट शक्यता आहे. कंपनीकडे सध्या अनेक राज्यांमध्ये परसलेल्या व्यवसाय असून देशभरामध्ये 580 हून अधिक आलिशान टेंट्स या कंपनीने उभारले आहेत. त्यामुळे भविष्यात या कंपनीतील गुंतवणूक फायद्याची ठरु शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
(Disclaimer: येथे देण्यात आलेली माहिती स्टॉक्स ब्रोकरेजकडील आकडेवारीनुसार देण्यात आली आहे. तुम्ही अशाप्रकारे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास यासाठी जबाबदार राहणार नाही.)