मुंबई : जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. जगातील महत्वाच्या शेअर बाजारांमध्येही घसरण नोंदवण्यात आली होती. त्यामुळे भारतीय बाजारांमध्येही गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला.
मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक सेंन्सेक्स सकाळी 9.30 च्या दरम्यान, तब्बल 1200 हून अधिका अंकाच्या घसरणीसह व्यवहार करीत होता तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक म्हणजेच निफ्टीमध्ये 400 हून अधिका अंकाची घसरण झाली.
सेंन्सेक्स सकाळी 9.30 वाजता 56873 अंकावर तर निफ्टी 408 अंकावर व्यवहार करीत होते. बाजाराच्या पडझडीचा परिणाम बँकिंग, पायाभूत सुविधा, ऑटो फार्मा इत्यादी क्षेत्रावर दिसून आला. गुंतवणूकदारांनी या शेअर्सची जोरदार विक्री केली.