मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गुरुवारी मध्यरात्री अचानकपणे मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. पाच राज्यांमधील निवडणुका आणि राम मंदिराविषयी दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ खलबते सुरु होती.
भाईंदरच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तीन दिवसीय शिबीर सुरु आहे. आज या शिबिराचा शेवटचा दिवस आहे.
तर दुसरीकडे मुंबईतही शिवसेनेचीही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पक्षाचे खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
Mumbai: BJP President Amit Shah is in Bhayandar's Keshav Shrusti where the RSS' 3-day executive meet will conclude today. He is expected to meet RSS leaders today. (file pic) pic.twitter.com/D4f4f5jLTh
— ANI (@ANI) November 2, 2018
Mumbai: BJP President Amit Shah has met several RSS leaders, including its chief Mohan Bhagwat, on the sidelines of RSS executive meet in Bhayandar this morning. #Maharashtra
— ANI (@ANI) November 2, 2018