Central Bank of India Job: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये लेव्हल 1 ते 5 अंतर्गत विविध विभागातील एकूण 192 अधिकारी पदांचा समावेश आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीची 1 जागा, सीए फायनान्स अकाऊंटच्या 3 जागा, रिस्क मॅनेजरच्या 4 जागा, फायनाशियल अनालिस्टच्या 9 जागा, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीच्या 94 जागा, लॉ ऑफिसरच्या 15 जागा, क्रेडीट ऑफिसरच्या 50 जागा, सिक्युरीटी ऑफिसरच्या 15 जागा भरल्या जाणार आहेत.
निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 48 हजार 170 ते 1 लाख 350 रुपये इतका पगार दिला जाईल. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून संबधित विषयात पदवी/ पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. यासह प्रत्येक पदाची पात्रता आवश्यकतेनुसार वेगळी असेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या भरतीत अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/पीडब्ल्यूबीडी उमेदवार/ महिला उमेदवारांकडून 175 अधिक जीएसटी तसेच खुल्या वर्गातील उमेदवारांकडून 850 अधिक जीएसटी इतका अर्ज शुल्क घेतला जाईल. यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज प्रक्रिया सुरु आहे. 19 नोव्हेंबर 2023 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी आपला अर्ज पूर्ण भरावा आणि सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करावीत, अन्यथा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.
भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवालयात विविध पदांच्या एकूण 125 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये कॉम्प्युटर सायन्स /आयटीच्या 60, इलेक्ट्रॉनिक्स &/ OR कम्युनिकेशनच्या 48, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 2, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या 2, गणितच्या 2, सांख्यिकीच्या 2, फिजिक्सच्या 5, केमिस्ट्रीच्या 3 आणि माइक्रोबायोलॉजीची 1 जागा भरली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून संबंधित विषयात बीई/बीटेक किंवा एमएससी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना स्तर-07 नुसार दरमहा रुपये 90 हजारपर्यंत पगार दिला जाईल याची नोंद घ्या. उमेदवारांना दिल्ली येथे नोकरी करावी लागेल. उमेदवारांनी आपला अर्ज पोस्ट बॅग नंबर 001, लोधी रोड, हेड पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली -110003 या पत्त्यावर पाठवायचा आहे. 6 नोव्हेंबर 2023 ही अर्जाची शेवटची तारीख आहे.