मुंबई : अनंत चतुर्दशीदिवशी होणारी भाविकांची गर्दी पाहता त्यांच्या सोयीकरिता मध्यरेल्वेने काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रात्री बारानंतर आठ विशेष गाड्या चालवण्यात येतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याण व ठाणे आणि हार्बरवर सीएसएमटी ते पनवेल अशा एकूण आठ विशेष लोकल चालविण्यात येणार आहे. मध्य आणि हार्बरप्रमाणे पश्चिम रेल्वेवर संध्याकाळी ५.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत मुंबई सेंट्रल ते चर्चगेट स्थानकापर्यंत जलद लोकलही सर्व स्थानकांवर थांबविण्यात येणार आहेत.
विशेष गाड्या आणि त्याचे वेळापत्रक
सीएसएमटीहून रा. १.३० वा. सुटून कल्याणला रा. ३ वाजता पोहोचेल.
सीएसएमटीहून रात्री २.३० वा. सुटून ठाण्यास रात्री ३.३० वा. पोहोचेल.
कल्याणहून रात्री १ वा. सुटून सीएसएमटी रात्री २.३०वा. पोहोचेल.
ठाण्याहून रात्री २ वा. सुटून सीएसएमटी रात्री ३ वा. पोहोचेल.
हार्बर मार्गावरील विशेष फेऱ्या
सीएसएमटीहून रा. १.३०वा. सुटून पनवेलला रा.२.५०वा. पोहोचेल.
सीएसएमटीहून रा. २.४५वा. सुटून पनवेलला रा.४.०५वा. पोहोचेल.
पनवेलहून रा. १ वा. सुटून सीएसएमटीस रा. २.२०वा. पोहोचेल.
पनवेलहून रा. १.४५ वा. सुटून सीएसएमटी रा.३.०५वा. पोहोचेल.
विसर्जनसाठी रस्त्यांवर होणारी गर्दी पाहता, वाहतुकीच्या मार्गांमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. सुरळीत विसर्जन होण्यासाठी काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. परिणामी बेस्ट सेवांनीही त्यांच्या काही फेर्या रद्द केल्या आहेत.