मुंबई : मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उरलेल्या सर्व आमदारांना मुंबई न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढीच तीन चार दिवस महत्वाचे असल्याचं या बैठकीत चर्चा झाली आहे. ग्रामीण भागातील आमदारांना मुंबईत बोलवण्यात आलं आहे.
गुवाहाटीतील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. काही आमदार आपल्या संपर्कात आहेत. ते आपल्या सोबत येतील असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी आमदारांसोबत साधलेला संवादात व्यक्त केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, 'गुवाहाटी येथे असणाऱ्या आमदारांना मुख्यमंत्र्यांनी आज आवाहन केलंय. ज्यांना यायचं आहे त्यांच्यासाठी दरवाजे उघडे आहे. फ्लोर टेस्ट होण्यापूर्वी मॉरॅलिटी टेस्ट होणार आहे.'
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष सुरु झाला आहे. त्यामुळे आता शिवसेना नेमकी कुणाची शिंदेंची की ठाकरेंची अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण शिंदे गटाने शिवसेनेवर दावा केला आहे.