Coastal Road: कोस्टल रोड येथील भुयारी मार्गावर गळती झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर कोस्टल रोडच्या काही जॉइंटला लीकेजला होते. त्यामुळं इतर ठिकाणी ओल असल्याचे बघायला मिळाले होते. मात्र, आता दोन दिवसांनंतर कोस्टल रोडची गळतीचे काम सुरू झाले असून दुरुस्त करण्यात आले आहे. त्यानंतर आता कोस्टल रोडचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार? असे प्रश्न चर्चेत येत आहेत. मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जूनपर्यंत कोस्टल रोडचा दुसरा टप्पा नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यातील मरीन ड्राइव्ह येथील दक्षिणेकडील बोगद्यातील गळतीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. मार्चमध्ये उद्घाटन करण्यात आलेल्या कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 10 जूनपर्यंत खुला होणार आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 10 जून रोजी मरीन ड्राइव्ह ते हाजी अलीपर्यंतच तात्पुरता खुला करण्यात येणार आहे. त्यानंतर आम्ही वरळीच्या दिशेने जाणारा मार्गही खुला करण्याचा प्रयत्न करत आहोत. वांद्रे-वरळी सी लिंक ते मरीन ड्राइव्हपर्यंतचा संपूर्ण किनारी रस्ता ऑक्टोबरपर्यंत खुला केला जाणार आहे.
सध्या कोस्टल रोडचा पहिल्या टप्प्यात वाहतूक सुरू आहे. वरळी ते मरीनड ड्राइव्ह या दहा किलोमीटर लांबीच्या कोस्टल रोडवरुन वाहतुक सुरू आहे. प्रवाशांसाठी कोस्टल रोड सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत सुरू असतो. कोस्टल रोडचे राहिलेले काम अंतिम टप्प्यात आहे. तसंच. कोस्टल रोडमुळं मुंबईकरांना तब्बल पाऊण तासांचा प्रवास अवघ्या दहा ते 15 मिनिटांत करता येतो. संपूर्ण कोस्टल रोड प्रकल्पासाठी 12,700 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
कोस्टल रोड प्रकल्प दोन विभागात विभागला गेला आहे. दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे दोन भाग आहेत. दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे दोन भाग आहेत. यात सुरुवातीला दक्षिण भागाचे काम हाती घेण्यात आले होते. मुंबई ते कांदिवली दरम्यान 29 किमीचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडेदहा किमीचा असून मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाओवर पासून सुरू होतो ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंत आहे.