मुंबई : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंध जाहीर लागू केले आहेत. दरम्यान यानंतर व्यापारी संघटनांची नाराजी पाहायला मिळत आहे. आम्हाला नुकसानभरपाई देणार का ? असा प्रश्न व्यापारी संघटनांनी राज्य सरकारला विचारलाय. हा मिनी लॉकडाऊन आहे असं सरकार म्हणत आहे मात्र व्यापाऱ्यांसाठी हा पूर्णपणे लॉकडाऊन आहे. मॉल, रेस्टॉरंट बंद असणार आहेत. 13 लाख दुकानांपैकी 10% दुकानं अत्यावश्यक असतील. बाकी सर्व दुकानं बंद राहणार आहेत. या निर्णयामुळे व्यापारी नाराज आहेत.
वाढत्या कोरोनामुळे सरकारने हा निर्णय घेतला. पण आमच्या कर्मचाऱ्यांचा पगार कोण देणार, टॅक्स, भाडं कसं भरणार ? असा प्रश्न व्यापारी संघाचे अध्यक्ष विरेन शाह यांनी उपस्थित केलाय. आम्ही सरकारबरोबर आहोत, पण जर लोक घरी बसले तर खाणार काय ? त्यांना पगार कोण देणार ? त्यांच्या मुलांना कुटुंबाना पैसे कोण देणार ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.
अनेक दुकानं, मॉल भाड्यावर असतात, भाडं कसं भरायचं ? याचे उत्तर महाविकास आघाडी सरकारने द्यावे अशी मागणी व्यापारी संघटनेनं केलीय.