मुंबई : राज्यासह देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत (Corona Patient Increse) झपाट्याने वाढ होतेय. राज्य लॉकडाऊनच्या दिशेने चालले असून शासनाने निर्बंध अत्यंत कठोर केले आहेत. मेडीकल, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांव्यतिरक्त दुकानांसाठी ठराविक वेळा असणार आहेत. सोन्या- चांदीच्या खरेदीवर याचा परिणाम पाहायला मिळणार आहे.
लग्नकार्यातील नियम देखील अत्यंत कठोर करण्यात आले आहेत. आपल्यासोबत आपल्या कुटुंबियांचा जीव वाचवण्याला नागरिकांची प्राथमिकता आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू आणून ठेवण्याकडे नागरिकांचा कल सध्या जास्त आहे. असे असले तरी सोने-चांदी खरेदी कमी असली तरी त्यांचे दर (Gold Silver Rate) जाणून घेणे हा सर्वांसाठी महत्वाचा विषय असतो.
देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 44, 420 इतका आहे. काल हा दर 44,410 इतका होता. यामध्ये आज 10 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 44,860प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. काल हा दर 44,850 इतका होता.
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 43,920 इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 44,920 इतका आहे.
100 ग्रॅम चांदीची किंमत आज 6500 रुपये इतकी आहे. काल ही किंमत 6501 इतकी होती.