वैभव नाईक पुन्हा ACB चौकशीच्या फेऱ्यात; दबावासाठी कारवाई सुरू असल्याचा आरोप

Vaibhav Naik : वैभव नाईक पुन्हा एकदा चौकशीच्या फेऱ्यात... अशात दबावासाठी कारवाई सुरु असल्याचा आरोप... 

दिक्षा पाटील | Updated: Feb 11, 2025, 08:32 PM IST
वैभव नाईक पुन्हा ACB चौकशीच्या फेऱ्यात; दबावासाठी कारवाई सुरू असल्याचा आरोप title=

Vaibhav Naik : माजी आमदार वैभव नाईक पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.  गेल्या कही दिवसांपासून शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते वैभव नाईक आणि त्यांच्या कुटुंबाची ACB कडून चौकशी सुरू आहे. आजही त्यांची चौकशी झाली आहे. तर नाईकांच्या इंडस्ट्रीबाबत तपास केला जातोय.

ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या अडणीत वाढ होताना दिसतीये. वैभव नाईक आणि यांच्या पत्नी स्नेहा नाईक यांची एसीबी चौकशी सुरु झालीये. गेल्या काही महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून वैभव नाईकांच्या संपत्तीची चौकशी केली जातेय. त्यांच्या इंडस्ट्रिजमधील उत्पन्न आणि खर्चाबाबत ही चौकशी होते. 2022 पासून चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. मात्र, नाईक यांनी कागदपत्रे पूरविली नसल्याने पुन्हा एकदा चौकशी साठी बोलावल्याची माहीती समोर आली आहे.

HUF, नाईक स्टोन इंडस्ट्रिजची चौकशी
2002 ते 2022 या कालावधीतील उत्पन्न वाढीसंदर्भात ACB चा तपास
वीस वर्षातील आर्थिक व्यवहारांची चौकशी
आतापर्यंत 3 वेळा चौकशीसाठी नाईक ACB कार्यालयात हजर 

दरम्यान, आमदार वैभव नाईक आणि पत्नी स्नेहा नाईक यांची एसीबी चौकशी संपली आहे. साडेसहा तासाहून त्यांची चौकशी सुरू होती. रत्नागिरी एसीबी कार्यालयात नाईक दाम्पत्याची दुपारी 12 वाजल्यापासून चौकशी सुरु करण्यात आली होती. संपत्तीच्या चौकशीच्या अनुषंगाने नाईक दाम्पत्याने विविध कागदपत्रे सादर केली.

एखाद्यावर दबाव आणायला किंवा त्रास देण्यासाठी हे केलं जात आहे. पण मी चौकशीला सहकार्य करणार असल्याचं वैभव नाईक यांनी म्हटलं आहे. 2022 पासून वैभव नाईकांची चौकशी केली जात आहे. राज्यातील अनेकांच्या पक्षांतरानंतर चौकशी थांबलेली आहे, असा आरोप नाईकांनी केला आहे. आता या तपासातून काही समोर येईल का? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.