Haribhau Bagde Controversial Statement: राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे त्यांच्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. राज्यघटनेच्या मूळ प्रतीमध्ये महापुरुषांची आणि देवतांची चित्रं होती ती हटवण्यात आल्याचा आरोप हरिभाऊ बागडेंनी केलाय. राज्यघटनेत देवतांची चित्र पुन्हा छापावीत असा आग्रह बागडेंनी धरलाय. हरिभाऊ बागडेंच्या या दाव्यावर भुजबळांनी मात्र कानावर हात ठेवलेत.
भारतीय राज्यघटना हा विषय प्रत्येक भारतीयासाठी जिव्हाळ्याचा आहे. याच राज्यघटनेबाबत सगळे आश्चर्यचकीत होतील असा दावा राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडेंनी केलाय. बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केलेल्या मूळ राज्यघटनेत महापुरुष आणि देवदेवतांचे फोटो होते असा दावा हरिभाऊ बागडेंनी केलाय. त्या मूळ प्रतीत शिवाजी महाराज, श्रीराम आणि नटेश्वराचे फोटो होते असंही महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणालेत.
राज्यघटनेतून हटवलेल्या देवतांच्या फोटोंचा समावेश करण्यासाठी सामान्यांनी मागणी करावी असं आवाहनही त्यांनी केलंय. राज्यघटनेतून हटवलेले फोटोंचा समावेश करण्यापासून कोण रोखतोय ते पाहतो असा इशाराही राज्यपालांनी दिलाय.
राज्यपाल हरिभाऊ बागडेंनी केलेल्या दाव्यावर छगन भुजबळांनी आश्चर्य व्यक्त केलंय. राज्यघटनेत देवतांचे फोटो होते हे आपण पहिल्यांदाच ऐकत असल्याचं भुजबळांनी सांगितलं. राज्यपालासारख्या संविधानिक पदावर असलेल्या हरिभाऊ बागडेंनी केलेला भुजबळांसह बहुतांश भारतीयांना आश्चर्यचकीत करणारा आहे. महामहीम राज्यपालांनी केलेला दाव्याबाबत तसे पुरावे जाहीर करावेत अशी मागणी आता सामान्यांतून होऊ लागलीये.
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित हे त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. ब्राह्मण ही जात नाही, तो एक वर्ण आहे, असा युक्तीवाद न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित यांनी केलाय. हे विधान करताना त्यांनी संविधान निर्माते बीआर आंबेडकर यांच्या एका विधानाचा संदर्भ दिला. संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे मोठे योगदान आहे, असा दावा त्यांनी केला होता. ते संविधान निर्मितीत ब्राह्मणांच्या योगदानावर प्रकाश टाकत होते. जर ब्राह्मणांनी त्यावेळी संविधानाचा मसूदा तयार केला नसता तर त्याला आणखी 25 वर्षे लागली असती, असेही त्यांनी म्हटले. हे सांगत असताना न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित यांनी आंबेडकरांचे एक विधान कोट केले.अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या 'विश्वामित्र' ब्राह्मण परिषदेत न्यायमूर्ती दीक्षित बोलत होते. 'डॉ. आंबेडकरांनी भांडारकर संस्थेत एकदा म्हटले होते की, जर बी.एन. राव यांनी संविधानाचा मसुदा तयार केला नसता तर त्याला 25 वर्षे लागली असती.' संविधान मसुदा समितीच्या सात सदस्यांपैकी तीन, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार आणि बी.एन. राव हे ब्राह्मण होते. ब्राम्हण हा शब्द जातीऐवजी 'वर्ण'शी जोडला पाहिजे, असे ब्राह्मणांविषयीची आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी म्हटले.