मुंबई : दूध दरासंदर्भात आधी ठोस प्रस्ताव द्या,त्यानंतरचं राज्य सरकारशी चर्चा करु अशी भूमिका दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीनं घेतली आहे. दूधाला प्रति लिटर २७ रुपयांचा दर द्यावा या मागणी साठी राज्यभर दूध उत्पादक शेतकरी समितीनं आंदोलन छेडलं आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी संघर्ष समितीला चर्चेसाठी बोलावलं आहे. शेतकरी संघर्ष समितीनं राज्य सरकारच्या भूमिकेचं स्वागत केलं असली तरी दूध दराबाबत प्रस्ताव दिल्याशिवाय चर्चा करण्यास नकार दिला आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी अत्यंत मफक असून, प्रस्तावाशिवाय चर्चा निष्फळ ठरते असं अनुभव असल्याचं संघर्ष समितीनं स्पष्ट केलं आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचं संघर्ष समितीनं सांगीतलं आहे. त्यामुळे आता राज्य सरकार कोणती भूमिका घेतं याकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.