कलवरी वर्गातील तिसरी ‘करंज’ पाणबुडी नौसेनेत दाखल

कलवरी वर्गातील तिसरी पाणबुडी 'करंज' चे आज मुंबईतल्या माझगांव गोदीमध्ये जलावतरण होत आहे. 

Updated: Jan 31, 2018, 01:31 PM IST
कलवरी वर्गातील तिसरी ‘करंज’ पाणबुडी नौसेनेत दाखल title=

मुंबई : कलवरी वर्गातील तिसरी पाणबुडी 'करंज' चे आज मुंबईतल्या माझगांव गोदीमध्ये जलावतरण झालं आहे. 

याआधी आयएनएस कलवरी 

याआधी कलवरी वर्गातील पहिली पाणबुडी आयएनएस कलवरी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नौदलात दाखल झाली असून दुसरी पाणबुडी INS खंदेरीच्या चाचण्यां अंतिम टप्प्यात आहेत.

एकूण इतक्या पाणबुड्या

2005 मध्ये भारत आणि फ्रान्स देशांत स्कॉर्पिन पाणबुडीच्या तंत्रज्ञान हस्तातरणबाबत करार झाला होता, त्या अंतर्गत एकूण 6 पाणबुड्या बांधल्या जाणार आहेत. या पाणबुड्यांचे भारतीय नावं कलवरी असे ठेवण्यात आले आहे. या कराराअंतर्गतली ही तिसरी पाणबुडी आहे.

काय आहे वैशिष्ट्ये

- 'करंज' पाणबुडीची लांबी ६७.५ मीटर, उंची १२.३ मीटर तर वजन १५६५ टन आहे. 

- 'करंज' टॉरपीडो आणि अँटी शिप क्षेपणास्त्रांचा माराही करू शकते. युद्धाच्या वेळी 'करंज' अत्यंत सुरक्षितपणे आणि सहज शत्रूला चकवा देऊन जाऊ शकते. 

- या पाणबुडीचा वापर हरतऱ्हेच्या युद्धात, अँटी सबमरीन वॉरफेअर आणि इंटेलिजन्सच्या कामातही केला जाऊ शकतो. 

- 'करंज'चं सर्वात मोठं वैशिष्ट्यं असं की ती कोणत्याही रडारच्या टप्प्यात येत नाही. या पाणबुडीतून जमीनीवरही मारा करता येतो. 

 

किती आहे पाणबुडीचं वजन

कलवरी वर्गातील पाणबुडीचे वजन सुमारे 1700 टन असून पाण्याखालून क्षेपणास्त्र मारा करण्याची या  पाणबुड्यांची क्षमता आहे. डिझेल इलेक्ट्रिक पाणबुड्यांच्या बाबतीत कलवरीचे तंत्रज्ञान जगात उत्तम समजले जात आहे. रडारवर चटकन शोधता येणार नाही अशी रचना आणि तंत्रज्ञान कलवरी वर्गातील पाणबुड्यांचे आहे.