Mumbai Results LIVE: शिवसेनेच्या विजयी आमदारांना मुंबईतील बड्या हॉटेलमध्ये ठेवले

Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 Live Updates: मुंबईवर सत्ता कोणाची, देशाच्या आर्थिक राजधानीत आवाज कुणाचा? तुल्यबळ लढतींवर सर्वांचं लक्ष...   

Mumbai Results LIVE:  शिवसेनेच्या विजयी आमदारांना मुंबईतील बड्या हॉटेलमध्ये ठेवले

Mumbai Vidhan Sabha Election Results LIVE: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं आणि आता निकालाचा दिवसही उजाडला. यंदाच्या वर्षी मुंबईतील कैक मतदारसंघांमध्ये तुल्यबळ लढती पाहायला मिळत असून, काही नवखे उमेदवार पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात त्यांचं नशीब आजमावत आहेत. शहरातील वडाळा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यंदा निवडणुकीत विजयी ठरल्यास त्यांच्या नावे एका विक्रमाची नोंद केली जाणार आहे. हा विक्रम असेल सर्वाधिक वेळा आमदारकीचं शिवधनुष्य पेलण्याचा... 

मुंबईतील विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण बाजी मारतं आणि मुंबईवर कोणाची सत्ता राहते यासंदर्भातील सर्व अपडेट पाहण्यासाठी इथं क्लिक करा... 

23 Nov 2024, 14:22 वाजता

वसई विरारमधील धक्कादायक निकाल समोर 

क्षितीज ठाकुरांमागोमाग वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकूरांचा पराभव. 10 हजारहून अधिक मतांनी पराभव 

23 Nov 2024, 14:20 वाजता

डोंबिवलीतून विजयी निकाल समोर 

डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण 76802 ने विजय.

 

23 Nov 2024, 13:54 वाजता

महत्त्वाचे निकाल हाती 

मुंब्रा कळवा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड हे 95145 मतांनी विजयी. तिथं मलबार हिल मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं मंगलप्रभात लोढासुद्धा विजयी. तर, वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे 13 व्या फेरीअखेर 7440 मतांनी आघाडीवर. 

23 Nov 2024, 13:41 वाजता

 आदित्य ठाकरे आघाडीवर

वरळीत आदित्य ठाकरे 12 व्या फेरीअखेर 6120 मतांनी आघाडीवर

 

23 Nov 2024, 12:49 वाजता

माहिममध्ये अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार 

माहिम मतदारसंघात महेश सावंत यांच्याकडे 22249 आघाडी. सदा सरवणकर 8136 मतांनी पिछाडीवर. 7 व्या फेरीअखेर मतांची संख्या... 

महेश सावंत 22249 
सदा सरवणकर 14113
अमित ठाकरे 9965

हेसुद्धा वाचा : Mahim Results 2024 Live Updates : माहिममध्ये उलटफेर होणार? अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार

 

23 Nov 2024, 12:39 वाजता

महायुतीच्या यशस्वी वाटचालीसंदर्भात काय म्हणाले विनोद तावडे? 

'महाराष्ट्र च्या जनतेने महायुतीला जो प्रचंड विजय दिलाय त्याबद्दल जनतेचे आभार. हा जो विजय झलाय तो मोदींच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे फडणवीस अजित पवार आठवले या सर्वांनी एकत्र काम केलं. विकास कामे, लाडकी बहीण सारख्या योजना यामुळेच जनतेला विश्वास बसला' असं विनोद तावडे म्हणाले. महायुतीला मिळालेल्या यशानंतर त्यांनी काही मुद्दे मांडत मविआसंदर्भात लक्षवेधी वक्तव्य केलं. 'नैसर्गिक युती पवारांनी ठाकरेंनी तोडली तो राग होता. रोज सकाळी राजकारण कलुषित करण्याचं वक्तव्य यायचं त्यामुळे बाळासाहेबांचा शिवसैनिक नाराज होता', असं ते म्हणाले. 

23 Nov 2024, 12:26 वाजता

मोठी बातमी : कालिदास कोळंबकर यांचा विक्रमी विजय; भरघोस मताधिक्य 

वडाळा मतदारसंघातून कालिदास कोळंबकर पुन्हा एकदा विजयी झाले असून, आमदारकीची ही त्यांची नववी कारकिर्द आहे. या विजयासह कोळंबकर यांच्या नावे विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. 25 हजार मतांनी कोळंबकर विजयी. 

23 Nov 2024, 12:20 वाजता

वरुण सरदेसाई आघाडीवर.... 

वांद्रे पूर्व मतदारसंघात 9 व्या फेरीनंतर आघाडीवर कोण? 

झिशान सिद्धीकी -  20324
तृप्ती सावंत - 10838
वरूण सरदेसाई - 26018
वरूण सरदेसाई 5694 मतांनी आघाडीवर

23 Nov 2024, 12:17 वाजता

चेंबूरमध्ये दोन्ही शिवसेनेत कांटे की टक्कर 

चेंबूरमध्ये नवव्या फेरीनंतर शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत 

प्रकाश फातरपेकर 23670
तुकाराम काते- 26670
माऊली थोरवे- 3334
दीपक निकाळजे 5024

 तुकाराम काते 2639 मतांनी आघाडीवर

23 Nov 2024, 12:10 वाजता

ठाणे शहर विधानसभा दहाव्या फेरीनंतर काय चित्र? 

मनसे उमेदवार अविनाश जाधव :- 1615
शिवसेना उमेदवार ठाकरे गट राजन विचारे :-  1856 
भाजप उमेदवार संजय केळकर :- 4823

2967 संजय केळकर आघाडीवर
आता पर्यंत 26916 आघाडीवर संजय केळकर