Manoj Jarang Patil On Vidhansabha Election 2024 Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची विजय मिळवल्यानंतर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. भाजपसोबत महायुतीचा या घवघवीत यशानंतर मराठा आंदोलनाचे मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे फॅक्ट फेल झाल्याची चर्चा असल्याच त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, 'जरांगे फॅक्टर चालला नाही काय बुद्धीजीवी तुमची, कशाचा अभ्यास करता ओ तुम्ही जरांगे फॅक्टरचा अभ्यास करायला हयात जाईल. काय तुमचा फॅक्टर चव आली त्यात...तुम्हाला नीट माहिती नाही, आम्ही मैदानात उतरलो नाहीत, तर फेल कसे होणार, कोण निवडून आला काय आणि कोण पडल काय...याचं आम्हाला काही सोयरं सुतक नाही, अशा खणखणीत शब्दात जरांगे पाटील यांनी मनोज जरांगे फॅक्ट फेल या चर्चेवर आक्षेप घेतलाय.
जालनामध्ये पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील पुढे म्हणाले की, एक महिन्याभर थांबा ,तुम्हाला मराठ्यांची ताकद कळेल. या निवडणुकीत मराठ्यांचे 204 आमदार झाले. मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणीही सत्तेत येऊ शकत नाहीत. आम्ही मैदानात असतो तर मराठ्यांनी एक शिक्का काम केलं असतं. पण आम्ही सांगितलं होत मराठा समाजाला जे करायचं ते करा. मी दोघांचेही अभिनंदन करतो निवडून येणाऱ्याचही आणि एक पडणाऱ्याचंही मराठ्यांच्या फॅक्टरला बघूनच यांनी मराठ्यांना तिकीट दिले ना…, असं मनोज जरांगे म्हणालेत.
मराठा आरक्षणावर त्यांनी पुन्हा सामूहिक आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. 'सरकारला जाहीरपणाने सांगतो मराठा आरक्षण द्यायचं नसले तर पुन्हा छाताडावर बसणार. गुडघ्यावरच टेकवणार तुम्हाला. कुणाचाही सत्ता आली तरी आम्हाला संघर्ष करावच लागणार. पण हुरळून जायचं नाही मराठ्यांना छेडायचं काम करायचं नाही. सत्तेत आले म्हणून दादागिरी करायची हे मराठ्यांपुढे चालणार नाही. नसता भोग भोगावे लागतील. चांगले लोकं निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं. मराठ्यांशिवाय राज्यात कुणाचीही सत्ता येवू शकत नाही. आता मराठ्यांनी दिलं तर मराठ्यांना द्यायचं. मराठ्यांना मणगट लावायचं काम करायचं नाही. मराठ्यांच्या नादी लागणं सोपं आहे का? मीच मराठा समाज आझाद करून सोडला. मराठ्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं. कुणाचं सरकार आलं आम्हाला काही देणं घेणं नाही. मैदानात असतो तर धुरळा वाजवला असतो' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.