मुंबईत प्रवीण छेडांची होणार 'घरवापसी', भारती पवारही करणार भाजप प्रवेश

भारती पवारांमुळे भाजपाचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाणांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता

Updated: Mar 22, 2019, 10:15 AM IST
मुंबईत प्रवीण छेडांची होणार 'घरवापसी', भारती पवारही करणार भाजप प्रवेश  title=
डावीकडे प्रवीण छेडा, उजवीकडे भारती पवार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षबदल जोरात सुरू आहे. मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रविण छेडा घरवापसी करणार आहेत. छेडा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर ते घरवापसी करणार आहेत तर राष्ट्रवादीचे नेते ए. टी. पवार यांच्या कन्या डॉ. भारती पवार भाजपात प्रवेश करणार आहेत. भारती पवार या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत. गेल्या वेळी भारती पवार राष्ट्रवादीकडून दिंडोरीच्या मैदानात उतरल्या होत्या. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. यंदा त्यांचा पत्ता कापण्यात आला. त्यांच्याऐवजी धनंजय महाले यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या भारती पवार यांनी थेट भाजपात जाण्याचा निर्णय घेतलाय. तर दुसरीकडे भारती पवारांमुळे भाजपाचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाणांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे.

संजय काकडेंचं मन वळवण्याचा प्रयत्न

दुसरीकडे, काँग्रेसच्या वाटेवर असलेल्या संजय काकडेंशी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला. आज वर्षावर संजय काकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान काकडेंचं मन वळवण्याचं प्रयत्न मुख्यमंत्र्यांचा असणार आहे. त्याचबरोबर लोकसबा उमेदवारीच्या बदल्यात काकडेंवर मोठी जबाबदारी सोपवण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

भाजपची पहिली यादी जाहीर

भाजपची १८४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा वाराणसीतूनच निवडणूक लढणार आहेत. मात्र भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा गांधीनगरमधून पत्ता कट करण्यात आलाय. त्यांच्या जागेवर भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर राजनाथ सिंह लखनऊमधूनच लढणार असून नितीन गडकरी यांना नागपूरमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आलीय. केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांना पुन्हा अमेठीच्या मैदानात उतरवण्यात आलंय. त्यामुळे पुन्हा राहुल गांधी विरूद स्मृती ईराणी असा सामना रंगणार आहे. मात्र यावेळी त्या करिश्मा घडवणार का याबाबत उत्सुकता लागलीय. तर आपल्या विधानांमुळे नेहमीच वादात असणारे साक्षी महाराज यांना पुन्हा का उमेदवारी देण्यात आलीय हे मात्र समजू शकलेले नाही.

भाजपची पहिली यादी - महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं

 

नंदूरबार (एससी) - डॉ. हिना विजयकुमार गावित

धुळे - डॉ. सुभाष रामराव भामरे

रावेर - रक्षा निखिल खडसे

अकोला - संजय शामराव धोत्रे

वर्धा - रामदास चंद्रभानजी तडस

नागपूर - नितीन जयराम गडकरी

गडचिरोली - चिमूर (एसटी) - अशोक महादेवराव नेते

चंद्रपूर - हंसराज गंगाराम अहीर

जालना - रावसाहेब दानवे पाटील

भिवंडी - कपिल मोरेश्वर पाटील

उत्तर मुंबई - गोपाळ चिनय्या शेट्टी

उत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन

अहमदनगर - सुजय विखे पाटील

बीड - प्रीतम गोपिनाथ मुंडे

लातूर (एससी) - सुधाकर भालेराव श्रृंगारे

सांगली - संजय काका रामचंद्र पाटील