Ajay Choudhary Or Sudhir Salvi: उद्धव ठाकरे यांच्या शिवेसेनेकडून 65 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. पण शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिवडी सारख्या महत्वाच्या विधानसभेच्या जागेची उमेदवारी राखून ठेवण्यात आली होती. येथे विद्यमान आमदार अजय चौधरी आणि 'लालबागचा राजा'चे मानद सचिव सुधीर साळवी यांच्यात चर्चा सुरु होती. अखेर उद्धव ठाकरे यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे.
शिवडी मतदार संघातून अजय चौधरी यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
संकटकाळात सर्वजण सोडून जात असताना अजय चौधरी माझ्यासोबत राहिले. त्यामुळं त्यांना पुन्हा संधी देत आहोत, असे यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले. यानंतर सुधीर साळवी यांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला आणि बाहेर पडले. यानंतर अजय चौधरी यांनी एबी फॉर्म स्वीकारला. अजय चौधरी हे शिवडी विधानसभा मतदार संघातील विद्यमान खासदार आहेत. दरम्यान सुधीर साळवी हे विधानसभेसाठी इच्छुक होते. शिवडी मतदार संघातील मोठा वर्ग सुधीर साळवी यांना उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुक होता. पण आता मातोश्रीवरील निर्णयानंतर उमेदवारीची माळ सध्या अजय चौधरी यांच्या गळ्यात पडलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान, मी संघटनेशी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करणार अशी प्रतिक्रिया सुधीर साळवी यांनी दिली आहे.