Bala nandgaokar on Shivsena Collaps: झी 24 तासच्या 'जाहीर सभा'कार्यक्रमात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. शिवसेना फुटीविषयी बोलताना ते भावूक झालेले दिसले. शिवसेनेचा सुवर्ण काळ तुम्ही पाहिला. शिवसेनेनंतर मनसे, एकनाथ शिंदे यांची शिवसेना,उद्धव ठाकरे यांची शिवसेना असे पक्ष निर्माण झाले. शिवसेना फुटली या विषयावर बोलताना बाळा नांदगावकर भावूक झाले.
बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून हे क्लिष्ठ आहे. ज्या बाळासाहेबांनी जमिनीवरुन इथपर्यंत आणून ठेवलं, त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेची ही अवस्था पाहून खूप वाईट वाटतं. आम्हाला कोणी ओळखत नव्हतं. पण बाळासाहेबांनी आम्हाला उभ केलं. ही शिवसेना जर एकसंघ असतील तर या शिवसेनेला आव्हान देण्यासाठी कोणाची माय व्यायली नसती, असे नांदगावकर म्हणाले.
राजकारणात पुर्वीसारखी कमिटेड लोक आता नाहीत. आता क्वालिटी नाही तर क्वांटीटी आहे. चांगली लोक आली पाहिजेत. मी बाळासाहेबांना मातोश्रीवर जाऊन भेटलो. मी राज साहेबांसोबत जातोय. असं सांगितलं. त्यावेळी ते चिडलेसुद्धा. मला पक्षाकडून अनेक प्रलोभन होती. पण मी ठाकरे टू ठाकरे असा प्रवास केला.
दोन ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नाला काळ हे उत्तर आहे. समय बलवान है. मला राजकारणात काही नकोय. हे कुटुंब एकत्र आलं तर माझ्यासारखा सुखी कोणी नसेल, असे ते म्हणाले. हे सांगताना बाळा नांदगावकर यांना आपले अश्रू रोखता आले नाहीत. हे कुटुंब एकत्र आलं तर महाराष्ट्र, मराठी माणूस हिंदू सर्वांच गोमटं होईल. कित्येक मराठी कुटुंब वेगळी झाली आहेत. आम्ही मारामाऱ्या करायला लागलोय. भांडायला लागलो. जे घडायच ते घडलं. पण काळ याला उत्तर देईल. माझी तीव्र इच्छा असून काही उपयोग नाही. पण ठाकरे एकत्र येण्याला माझा हातभार लागला तर मी आनंदी असेन, असे ते यावेळी म्हणाले.
आमच्याकडे सर्व रॉ मटेरियल होते. प्रविण दरेकर, वसंत गीते सारखी अनुभवी मंडळीदेखील होती. पक्षाने जबाबदारी दिली तर त्याला न्याय देण्याचे काम माझे आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरण्याचे काम माझे आहे. स्वत:चा मतदार संघात राहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरायला हवं होतं. आमची आमदार मंडळी फिरली असती 13 चे 25 आमदार झाले असते. कार्यकर्त्यांना प्रेमाचा हात हवा असतो. त्यांच्या सुख दुखात जाणारा नेता हवा असतो.डोक्यामध्ये हवापण होती, असे त्यावेळी बाळा नांदगावकर म्हणाले.