आनंदवारी: पंढरपूरला न जाता मुख्यमंत्र्यांनी केली विठ्ठलाची पूजा

पुजेचा मान मिळालेल्या मानाच्या वारकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरुन आभार मानले. राज्यात सुख-शांती नांदो, असं साकडं जाधव दाम्पत्यानं विठ्ठलाला घातलं.

Updated: Jul 23, 2018, 09:33 AM IST
आनंदवारी: पंढरपूरला न जाता मुख्यमंत्र्यांनी केली विठ्ठलाची पूजा title=

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन पंढरपुरात होणाऱ्या आषढी वारीत कोणतीही अनुचीत घटना होऊ नये. यासाठी शासकीय पूजेसाठी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२३, जुलै) हटके पद्धतीने विठ्ठलाची पूजा केली. आज आषाढी एकादशी. अवघा वैष्णवांचा मेळा पंढरपूरला जमणार. पण, मुख्यमंत्र्यांनी या मेळ्यात हजेरी न लावता आपल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी विठ्ठलाची पूजा केली. दरम्यान पंढरपुरात शासकीय पुजेचा मान मिळालेल्या मानाच्या वारकऱ्यांचे त्यांनी ट्विटरवरुन आभार मानले. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांऐवजी विठ्ठलपुजेचा मान केणाला मिळणार याबाबत बरीच उत्सुकता होती. मात्र, हा मान हिंगोली येथील अनिल आणि वर्षा जाधव या दाम्पत्याला मिळाला. पंढरपुरात शासकीय पुजेचा मान मिळालेल्या मानाच्या वारकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरुन आभार मानले. राज्यात सुख-शांती नांदो, असं साकडं जाधव दाम्पत्यानं विठ्ठलाला घातलं.

भेटीलागी जीवा लागलीसे आसं.. ही भावना असते प्रत्येक वारकऱ्याची.. आणि म्हणूनच पांडूरंगाच्या भेटीनंतर या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर परमोच्च आनंद दिसतो. हाच आनंद आजही तमाम वारकऱ्यांमध्ये पंढरपूरमध्ये पहायला मिळत आहे.