Coastal Road मुंबईकरांसाठी खुला! 45 मिनिटांचा प्रवास 15 मिनिटांत; पाहा कुठून, कसा जाणार हा समुद्रालगतचा नवा मार्ग

Mumbai Coastal Road Inauguration : गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेला मुंबई कोस्टल रोड अखेर मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत समुद्रकिनारी पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. 

श्वेता चव्हाण | Updated: Mar 11, 2024, 12:22 PM IST
Coastal Road मुंबईकरांसाठी खुला! 45 मिनिटांचा प्रवास 15 मिनिटांत; पाहा कुठून, कसा जाणार हा समुद्रालगतचा नवा मार्ग title=

Mumbai Coastal Road News In Marathi : बहुप्रतिक्षित मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे वरळी ते मरीन ड्राइव्ह एका मार्गिकेचे आज (11 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.  ही मार्गिका मुंबईकरांसाठी मंगळवारपासून खुली करण्यात येणार आहे. तसेय या कोस्टल रोडवरुन आठवड्यातून पाच दिवस सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेतच प्रवास करणं शक्य होणार आहे. शनिवारी आणि रविवारी महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असेल. वरळीकडून मरिन ड्राइव्हकडे जाणारा रस्ता खुला करण्यात आला आहे. या मार्गामुळे पाउण तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत करणे शक्य होणार आहे.  

'कोस्टल'मुळे रोजच्या प्रवासाचा वेळ 10 ते 15 मिनिटांनी कमी होणार असल्याने लाखो मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. 10.58 किलोमीटर लांबीच्या मुंबई कोस्टल रोड प्रकल्पावर एकूण 14,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या प्रकल्पित जलाशय रस्ते, पूल, सुधारित रस्ते यांचा समावेश आहे. कोस्टल रोड छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.  तसेच संपूर्ण रस्ता टोलमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली होती.

86 टक्के काम पूर्ण 

2018 मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प नोव्हेंबर 2023 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होता. मात्र, स्थानिक मच्छीमार बांधवांनी दोन्ही खांबांमध्ये आंतरराख्यांच्या हालचाली सुरू केल्या. दोन खांबांमधील अंतर 60 मीटर असेल. हे अंतर 120 मीटरपर्यंत वाढवावे, अशी मागणी मच्छीमार बांधवांनी केली होती. ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली आणि कोस्टल रोडची कामला गती साध्य झाली. कोस्टल रोड प्रकल्पाचे 86 टक्के काम पूर्ण झाले असल्याने सध्या एकच मार्ग स्थलांतरासाठी खुला होणार आहे.

तसेच कोस्टल रोडवर प्रवास करताना कमाल वेग ताशी 80 किलोमीटर असेल. बोगद्यात वेग मर्यादा ताशी 60 किलोमीटर आहे. वळण, प्रवेश आणि निर्गमन बिंदूंची पातळी 40 किलोमीटर प्रति तास असेल. मुक्कामादरम्यान वाहन पार्किंग करणे किंवा रस्त्यावर वाहन थांबवणे, फोटो सेशन किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई असेल.

 

कोस्टल रोडची वैशिष्ट्ये

1) पुलांची एकूण लांबी - 2.19 किमी.

२) रस्त्याची लांबी – 10.58 किमी.

3) एकुन मार्गिका क्रमांक- 8

4) दोन्ही बाजूंना प्रत्येकी चार लेन - (4-4)

5) भराव टाकून बांधलेल्या रस्त्याची लांबी - 4.35 किमी. 

या वाहनांना कोस्टल रोडवर बंदी

1) सर्व प्रकारची अवजड वाहने, ट्रेलर, मिक्सर, ट्रॅक्टर, जड मालवाहने (बेस्ट/एसटी बस/स्थलांतरित वाहतूक वाहने वगळता) आणि सर्व मालवाहू वाहने.

२) दुचाकी, सायकली आणि दिव्यांग व्यक्तीच्या मोटारसायकल/स्कूटर (साइड कारसह)

3) तीनचाकी वाहने

4) जनावरांनी ओढण्यात येणाऱ्या गाड्या, टांगा, हातगाड्या.

5) पादचारी