मुंबई : राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने जोर धरला आहे. राज्यातील बदलते वातावरण, विरोधकांचा वाढलेला जोर, मंत्र्यांवर वाढते भ्रष्टाचाराचे आरोप, शिवसेनेची उघडपणे नाराजी यामुळे येत्या काही दिवसांत मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या विस्तारात काही प्रमुख मंत्री यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. वादग्रस्त गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, जयकुमार रावल, मंत्री म्हणून निराशनजक कामगिरी करणारे बबनराव लोणीकर, राज्यमंत्री विद्या ठाकूर यांचे मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे.
या जागी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे. राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आलेय. प्रकाश मेहता, जयकुमार रावल यांची पदे धोक्यात आली असताना कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार याची चर्चा झडू लागली आहे. तर भाजप आमदार आशिष शेलार, संजय कुटे यांची मंत्रिपदाच्या शर्यतीत नावे चर्चेत आहेत.
शिवसेनेचा १२ मंत्री पदांचा कोटा याआधीच भरला गेला आहे. तर २७ मंत्री भाजपाचे असून ३ मंत्री पद अजूनही. तेव्हा बदलाबरोबर ३ उर्वरित जागा भरल्या जातात का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवसेना खातेपालट करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असेल. तर मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमिताने गेली तीन वर्ष रखंडलेला महामंडळ सदस्यांचा कोटा भरला जाणार का याचीही चर्चा रंगू लागली आहे.