मुंबई : मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा ई मेल करणा-याला अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर धक्कादायक बाब समोर आली आहे. मंत्रालय बॉम्ब प्रकरणातील आरोपी भाजपचा माजी पदाधिकारी असल्याचा खुलासा झाला आहे. काही दिवसांपुर्वी शैलेंद्र शिंदे नावाच्या व्यक्तीने मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा मेल गृह विभागाला केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी चौकशी केल्यावर ही केवळ अफवा असल्याचं समजलं.
मुंबई मंत्रालय बॉम्ब प्रकरणातील आरोपी भाजपचा माजी पदाधिकारी आहे. शिंदे यांनी मंत्रालयात १५० मेल केले होते मात्र त्यावर उत्तर न आल्याने धमकीचा मेल केला. शैलेश शिंदे याला पुणे पोलिसांनी अटक करून काल मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. शिंदेच्या मुलाला शाळेत ऍडमिशन मिळाले नाही म्हणून गृहविभागालाही धमकीचा मेल केला होता.
शिंदे हे पुण्यातील घोरपडीच्या बि.टी.कवडे रोड परिसरातील इस्टर्न कोर्ट या इमारतीत राहतात. शैलेश शिंदे सध्या शहरात जमिन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतोय. भाजपाच्या माजी पदाधिकाऱ्याला अटक झाल्याने खळबळ
उडाली आहे. शिंदे यांच्या घरच्यांनी जो पर्यंत त्यांना पोलीस घरी सोडत नाही तोपर्यंत आम्ही बोलणार नाही असं सांगितलं आहे.
या कारणासाठी शिंदेंनी केला धमकीचा फोन?
दरवर्षी शाळा फी वाढ करत होती त्याविरोधात शिंदे विरोध करत होते. यावरून शाळा मानसिक त्रास देत होती. शाळेच्या विरोधात गेली पाचवर्ष शिंदे यांनी तब्बल १५० हून अधीक अमेल करून शाळेच्या विरोधात तक्रार केली आणि दाद मागम्याचा प्रयत्न केला. मात्र पाच वर्षात काही प्रतिसाद मिळाला नाही. शिंदे यांचा मुलगा मागच्या वर्षी १० वी पास झाला मात्र शाळेने अजुनही अकरावीचे ऍडमीशन दिले नाही. याबाबत ही त्यांनी मेल करून दाद मागितली होती. त्यालाही शिक्षण विभागाकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी हे पाउस उचलल्याचे त्यांच्या कुटुंबुयांचे म्हणणे आहे.