मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये शनिवारी वाढ झाली नाही. ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 70 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. मुंबईत शनिवारी पेट्रोलचे दर स्थिर होते.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दररोज सकाळी 6 वाजता बदल होत असतो. सकाळी 6 वाजता नवे दर लागू होत असतात. पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि अन्य कर जोडल्यानंतर त्याचे दर जवळपास दुप्पट होतात. परकिय चलन तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती किती आहेत? या आधारावर रोज पेट्रोल - डिझेलच्या किंमतींमध्ये बदल होत असतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती 70 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचल्यास देशात पुन्हा इंधन दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता आहे.