मुंबई : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला मार्डच्या डॉक्टरांचा संप अखेर मागे घेण्यात आलय. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तोडगा काढण्यात यश आलंय. मार्डच्या डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भातली सर्वात महत्त्वाची मागणी मान्य करत जे जे रुग्णालयात आजपासून २८ सुरक्षा रक्षक वाढवून देण्यात आले आहेत. तसंच अलार्म बेलची अंमलबजावणी सुरू केली असून पुढच्या दीड-दोन महिन्यात ही सेवा कार्यरत होणार असल्याची ग्वाही गिरीश महाजन यांनी दिलीय.
हा संप मागे घेतल्यामुळे राज्यभरातून उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळालाय. जेजे रुग्णालयात एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळं त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना बेदम मारहाण केली होती. त्यानंतर सुरक्षेच्या मुद्यावर मार्डच्या निवासी डॉक्टरांनी बेमुदत आंदोलन पुकारलं होतं.