मुंबई : आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
मुलुंड-माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ पासून ते सायंकाळी ४.१५ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याणहून सकाळी १० वा. पासून दुपारी ३.५६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल. सर्व उपनगरीय सेवा दिवा आणि परळ स्थानका दरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या परळस्थानका पर्यंत सर्व स्थानकांवर थांबतील.
परळ स्थानकापासून सदर गाड्या अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा २० मिनटे उशिरा शेवटच्या स्थानकांवर पोहचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.05 पासून दूपारी ३.२२ वाजेपर्यत प्रस्थान करणा-या डाऊन मार्गावरील जलद गाड्या आपल्या निर्धारित थांब्या व्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप मुलुंड आणि दिवा स्थानकावर थांबतील. या गाड्या आपल्या निर्धारित वेळे पेक्षा २० मिनटे उशिरा शेवटच्या स्थानकांवर पोहचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी ११.०० पासून सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत आगमन/प्रस्थान करणा-या डाऊन तसेच अप मार्गावरील धीम्या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा १० मिनटे उशीरा पोहचतील.
ब्लॉक काळात दादर/छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आगमन होणा-या सर्व मेल/एक्सप्रेस गाड्या मुलुंड व माटुंगा स्थानकादरम्यान अप स्लो लाइन मार्गावरुन धावतील व आपल्या गंतव्य स्थानंकावर २० मिनटे उशीरा पोहचतील.
- ५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी सेवा दिवा स्थानकावर समाप्त करण्यात येईल.
- ५०१०३ दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी दिवा स्थानकातून सुटेल.
- ५०१०३ गाडीच्या प्रवाशांसाठी दादर ते दिवा विशेष उपनगरीय गाडी चालविण्यात येईल जी दादरहून ३.४० वाजता सुटेल आणि ठाणे स्थानंकावर ४.०६ वाजता पोहचेल आणि ४.१३ वाजता दिवा स्थानकावर पोहचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड वरून सकाळी ११.३४ वाजल्यापासून ते दूपारी ४.४७ वाजेपर्यत वाशी/ बेलापुर /पनवेल येथे जाणा-या तसेच छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.५६ ते दूपारी ४.४३ वाजेपर्यत बांद्रा/अंधेरी च्या दिशेने जाणा-या सर्व उपनगरीय सेवा रद्द राहतील.
पनवेल/बेलापुर/वाशी वरून सकाळी ९.५३ वाजल्यापासून ते दूपारी ३.२० वाजेपर्यत छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणा-या सर्व सेवा तसेच अंधेरी/बांद्रा वरून सकाळी १०.४५ वाजल्यापासून सायंकाळी ५.९ ९ वाजपर्यंत छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणा-या सर्व उपनगरीय सेवा रद्द राहतील.
ब्लॉक काळात पनवेल-कुर्ला (फलाट क्रमांक ८) खंडावर विशेष सेवा चालविण्यात येतील.
ब्लॉक काळात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यत हार्बर मार्गावरील प्रवाशांना पश्चिम रेल्वे/ मुख्य मार्गावर प्रवास करण्याची मुभा राहील.