Mumbai Metro Jobs 2024: मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. या पदांवर नोकरी मिळालेल्या उमेदवारांना 2 लाखांपर्यंत पगार दिला जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
मुंबई मेट्रोमध्ये अंतर्गत सहाय्यक महाव्यवस्थापक, उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंता ही पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी मुंबई मेट्रोच्या अधिकृत वेबसाइट mmrcl.com वर 27 नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने कोणत्या पदासाठी किती जागा सोडल्या आहेत? याचा तपशील जाणून घेऊया. सहाय्यक महाव्यवस्थापक (सिव्हिल) चे 1, उपअभियंता (स्थापत्य) ची 5 पदे, कनिष्ठ अभियंता-II (स्थापत्य) चे 1 पद अशी एकूण 7 पदे भरली जाणार आहेत.
मुंबई मेट्रोमधील सहाय्यक महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्णवेळ सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी असणे आवश्यक आहे. तर ज्युनिअर असिस्टंटसाठी पूर्णवेळ सिव्हिल इंजिनिअर पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे. याशिवाय पदानुसार अनुभव असणेही महत्त्वाचे आहे. अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
मुंबई मेट्रोच्या या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांचे कमाल वय 35 वर्षे असावे. उमेदवारांच्या वयाची गणना 1 नोव्हेंबर 2024 रोजी केली जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे.
सहाय्यक महाव्यवस्थापक पदासाठी उमेदवारांची किमान सीटीसी 8 लाख, उप अभियंता पदासाठी उमेदवारांची किमान सीटीसी 5 ते 6 लाख आणि कनिष्ठ अभियंता पदासाठी उमेदवारांची सीटीसी 5 लाखांपर्यंत असावा.
त्यानंतर या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना पदानुसार 35 हजार 280 रुपये ते 2 लाख रुपयांपर्यंत पगार मिळेल.
ही भरती कंत्राटी आणि प्रतिनियुक्तीवर केली जात आहे. ज्यामध्ये उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय थेट वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. 28 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर ॲप्लिकेशन विंडोची लिंक बंद होईल. उमेदवारांनी या रिक्त पदासाठी वेळेत अर्ज करावेत.