मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत ५ ऑक्टोबरला चर्चेगेट स्टेशनवर मोर्चा काढण्यात येणार आहे, मनसेकडून परवानगीसाठी मुंबई पोलिसांना अर्ज देण्यात आला आहे. मनसे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११.३० वाजता मोर्चाला सुरूवात होणार आहे.
रेल्वेसेवेवरील राग व्यक्त करण्यासाठी, मनसेकडून मेट्रो सिनेमा ते चर्चगेट असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी मनसे मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकमधील ताकद पणाला लावणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
मोर्चाचं आयोजन करण्यासाठी मनसेकडून मोर्च बांधणी सुरू झाली आहे, यावर चर्चा कऱण्यासाठी राज ठाकरे यांनी बैठक देखील घेतली आहे. फक्त आकडा म्हणून नको, तर समस्या म्हणून तरी मुंबईकरांनी या मोर्चात सामील व्हावं असं आव्हान यापूर्वीच राज ठाकरे यांनी केलं आहे.