मुंबई : पर्युषण काळात (Paryushan Parva) काय खावं आणि काय नाही, याबाबत फतवे काढले जातात. त्यामुळे इतर धर्मीयांनाही याची सक्ती केली जाते. या पर्युषणाच्या फतव्यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे ( MNS Raj Thackeray) यांनी टोला लगावला आहे. ज्याला जे खावसं वाटतं त्याने ते खावं, असा टोला मनसेप्रमुखांनी लगावला. (mns chief raj thackeray said that he should eat whatever he wants)
राज ठाकरे नक्की काय म्हणाले?
"पर्युषण काळात खाण्यावरून फतवे नकोत, ज्याला जे खावसं वाटतं ते खावं", असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लगावलाय. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं.
हा टोला लगावताना त्यांनी स्वत:चंच उदाहरण दिलं. "घरातले श्रावण पाळतात मात्र माझ्यावर कोणतीही जबरदस्ती केली जात नाही", असं राज म्हणाले. लेव्हल नेक्स्ट या उपक्रमाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते मुंबईत उदघाटन झालं. यावेळी राज ठाकरेंनी पर्युषण काळातील खाण्या-पिण्याच्या बंधनावर सडेतोड मत व्यक्त केलं.
"प्रत्येक समाजाचा एक DNA असतो. जैन समाजात लता मंगेशकर आशा भोसले होऊ शकत नाहीत. जैन समाजात अंबानी होऊ शकतात", असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.