मुंबई : भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार वाऱ्याच्या वेगाने मान्सून पुढे सरकत मुंबईसह महाराष्ट्रात व्यापला आहे. येत्या ४८ तासांत मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरातसह मध्य प्रदेशात दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार १४ जून रोजी मान्सूनने वेगाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. येत्या पाच दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात चांगला पाऊल पडणार आहे. काही ठिकाणी मुसळदार पाऊ पडणार आहे.
मान्सून अपडेट | मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल. पुढच्या पाच दिवसांत मोठा पाऊस होणार. @ashish_jadhao @vithobasawant #Monsoon2020 pic.twitter.com/gzH2C4RnmO
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 14, 2020
मुंबईत मान्सून रविवारी दाखल झाला असला तरीही अजून विश्रांती घेती आहे. मान्सून दाखल झाल्यानंतर सोमवारी आणि मंगळवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
तसेच पुढील १० दिवसांत मध्य आणि उत्तर महाराष्ट्र, विदर्भात मान्सून येणार आहे. उत्तर महाराष्ट्र, मराटवाडा या भागांमध्ये दरवर्षी पाण्याचा प्रश्न उद्भवतो. या परिसरात यंदा मान्सून चांगला लागणार असल्यामुळे दिलासादायक बाब आहे.