मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबईमध्ये बाहेरच्या राज्यातून येणारे लोंढे दिवसंदिवस वाढतच चालले आहे. त्यामूळे इथल्या नैसर्गिक स्त्रोतांवर ताण पडत असतो. '२६ जुलै' सारख्या नैसर्गिक प्रलयात मुंबईला चांगलाच फटका बसतो अशी वेगवेगळी उदाहरणे देता येतीस. पण ही मुंबई खरचं पाण्याखाली बुडाली तर ?
मुंबई पाण्याखाली बुडणार हे कोण्या भविष्य सांगणाऱ्याचे भाकित नसून खुद्द नासाच्या रिपोर्टमध्येच यासंबंधी लिहिण्यात आले आहे.
या रिपोर्टनुसार मुंबई आणि कर्नाटकातील मंगरुळ ही ही दोन शहरे बुडण्याचा धोका आहे.
एखादी आपत्ती घडण्यापूर्वी त्यासंबंधीची माहिती मिळण्याची टेक्नोलॉजी नासाने विकसित केली. दरम्यान नासाने एका नव्या टुलची निर्मितीही केलीय. या टूलच्या माध्यमातून ग्लोबल वॉर्मिंगचा धोका आधीच ओळखता येतो.
सायन्स या मासिकात नासाचा हा निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आला आहे. जगभरात संभाव्य धोकादायक शहरांची यादी यामध्ये पाहायला मिळते. यातच मुंबई आणि मंगरुळ या भारतातील प्रमुख शहरांची नावेही दिसत आहेत. ही भारत आणि इथल्या शहरवासियांसाठी चिंतेची बाब मानली जात आहे.
नासाच्या या रिपोर्टनुसार जगभरातील धोकादायक शहरांची यादी पहायला मिळत आहे. खासकरुन मुंबई, मंगळूरचे नाव आल्याने या शहर वासियांच्या भुवया उंचावल्या आहेत. येणाऱ्या १०० वर्षांत मुंबईच्या समुद्र पातळीत १५.२६ से.मी. ने वाढ होणार असल्याचे नासाच्या रिपोर्टमध्ये लिहिले आहे.
मंगरुळच्या समुद्र पातळीत ही वाढ १५.९८ से.मी.ने होणार आहे. मंगळूरची परिस्थिती अत्यंत बिकट बनत चालल्याचे या अहवालात म्हटले आहे. मुंबईपेक्षाही मंगळूर गंभीर अवस्थेत असल्याचे या रिपोर्टमध्ये आहे.
ग्रॅडिएंट फिंगरप्रिंट मॅपिंग (जीएफएस) असे नासाच्या या टूलचे नाव आहे. यामध्ये एकूण २९३ शहरांमध्ये जीएफएस टूलचा वापर करण्यात आला.