Mansainik Murder: मुंबईच्या मालाड पूर्वे येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. दिंडोशी परिसरात मनसे कार्यकर्त्याची हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. रिक्षा चालक आणि स्थानिक फेरीवाल्यांकडून मनसे कार्यकर्त्याला जबर मारहाण करण्यात आली. ही मारहाण इतकी जबर होती की त्यात मनसैनिकाचा जीव गेला. आकाश माईन असे या मनसैनिकाचे नाव होते. तो 27 वर्षांचा होता. आकाश काल संध्याकाळी नवीन गाडी घेण्यासाठी मालाड स्टेशनवर गेला होता. येथून तो परत येत असताना मालाड पूर्वेत स्टेशनजवळ त्याला रिक्षावाल्याने कट मारली. मनसे कार्यकर्ता आकाशने रिक्षावाल्याला याबद्दल जाब विचारला. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली.
मलाड स्टेशनवर रिक्षा चालकाला त्याच्या फेरीवाल्या मित्रांची साथ मिळाली. त्यांचा दहा ते बारा जणांचा ग्रुप तयार झाला. हे सर्वजण आकाश मोईन याच्यावर तुटून पडले. सर्व बाजुने आकाश मार घात होता. पोटच्या लेकाला मार खाताना पाहून आई आकाशच्या अंगावर झोपली. वडीलदेखील मध्ये आले. पण घोळका आकाशला मारहाण करत राहिला. काहीजण त्याला लाथा बुक्क्यांनी मारु लागले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालाय.
रिक्षा आणि फेरीवाल्यांच्या या हल्ल्यात आकाश गंभीर जखमी झाला. त्याला जवळच्या ट्रामा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रात्री 12 वाजता आकाशची प्राणज्योत मालवली. या हल्ल्याप्रकरणी दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व्हिडीओत दिसणाऱ्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.या घटनेनंतर मनसे आक्रमक झाली आहे.
मनसेकडून पोलिसांवर आरोप करण्यात आले आहेत. ज्या पद्धतीने बाबा सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवली. 3 आरोपीना अटक केली आहे तर इतर आरोपीचे शोध घेतला जातोय. त्याप्रमाणे पोलिसांनी आकाशच्या मारेकऱ्यांना शोधण्यात तत्परता दाखवावी, असे आवाहन मनसैनिकांनी केले आहे.