मुंबई : घाटकोपर असल्फा येथून शितल भानुशाली ही महिला बेपत्ता झाली होती. मुंबईत आलेल्या मुसळधार पावसादरम्यान नाल्याच झाकण उघड राहून त्यात ती पडल्याची भीती वर्तवण्यात येत होती. अखेर आज तिचा मृतदेह हाजीअलीच्या समुद्रात सापडला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसात वाहून गेल्याचा स्थानिकांचा अंदाज खरा ठरला.
असल्फा मेट्रो खाली आणि आजू बाजूच्या परिसरात असलेल्या गटारात काल शोधकार्य सुरू होते. मात्र मुंबई महानगर पालिका, अग्निशमन दल आणि पोलीस यांना त्यात यश मिळालं नाही. दरम्यान काल रात्री ताडदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाजीअल्ली येथील समुद किनारी महिलेचा शव आढळून आला.
शीतलच्या घरच्यांना तिचे दागिने आणि कापड्यांवरून ओळख पटली. गटाराचे झाकण पावसाने उघडले असावे आणि त्यातून ही महिला वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.
अशाप्रकारे गटारातून वाहून जाऊन अनेक मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागला आहे. गटारावर बसवलेली झाकणे ही पाण्याच्या जोराने उघडतात आणि त्यात असा अपघात घडतोय. शीतल भानुशाली ही असल्फा येथील चाळीत राहत असून दळण आणायला गेली होती त्यानानंतर ती घरीच परतलीच नाही.