मुंबई : दहीहंडी हा साहसी क्रीडा प्रकार असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं सोमवारी मुंबई हायकोर्टात करण्यात आला. तेव्हा साहसी क्रीडा प्रकार म्हणजे काय, असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केला.
५ वर्षाच्या मुलाला उंचीवर चढवणं यात कोणतं साहस आहे? असा खोचक सवालही कोर्टानं केला. सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी दहीहंडीत लहान मुलांच्या समावेशाविरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल केलीय. त्याप्रकरणी सुनावणीच्या वेळी राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश कोर्टानं दिले. आशिष शेलारांनी यापुढे दहिहंडीच्या कार्यक्रमाला जाताना काळजी घ्यावी, असंही कोर्टानं सुनावलं.