Mumbai Local Megablock TimeTable: 16-17 नोव्हेंबरला बाहेर जाण्याचा प्लान आखताय का? तर लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. पश्चिम रेल्वेने शनिवार आणि रविवारी 12 तासांचा मेगाब्लॉक आयोजित केला आहे. गुरुवारी याबाबत घोषणा केली आहे. जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकादरम्यान एका पुलाच्या कामासंदर्भात हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे अवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 16 रोजी रात्री 11.30 च्या सुमारासा ब्लॉकची सुरुवार होईल. तर, दुसऱ्या दिवशी दुपारी 11.30च्या सुमारास ब्लॉक संपेल. या कालावधीत अप आणि डाउन धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत राहिल. तसंच, हार्बर रेल्वे मार्गावरही त्याचा परिणाम होणार आहे. पश्चिम रेल्वेने प्रसिद्धी पत्रकात याबाबत माहिती दिली आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक कालावधीत प्लॅटफॉर्म अनुपलब्ध असल्यामुळे सर्व UP आणि DOWN धीम्या मार्गावरील गाड्या राम मंदिरवगळता अंधेरी आणि गोरेगाव/बोरिवली स्थानकांदरम्यान जलद मार्गावर चालवल्या जातील. मध्य रेल्वेकडून हार्बर मार्गावरील सर्व उपनगरीय सेवा आणि चर्चगेट ते गोरेगाव/बोरिवली दरम्यानच्या काही धीम्या सेवा अंधेरीपर्यंतच असतील. मेगाब्लॉक कालावधीत सर्व मेल व एक्स्प्रेसच्या 10 ते 20 मिनिटे उशिराने धावणार आहेत.
20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी, कर्मचारी हे उशिरापर्यंत कर्तव्यावर असतात. अशावेळी त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने उशिरापर्यंत गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 20 नोव्हेंबर रोजी पहाटे आणि मध्यरात्री उशिरा या गाड्या कल्याण आणि पनवेल या धिम्या मार्गावर धावणार आहेत. निवडणूक कर्तव्य बजावणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांनादेखील या सेवांचा फायदा होणार आहे. मध्य रेल्वे 20 नोव्हेंबर रोजी विशेष लोकलचे वेळापत्रक लावणार आहे. पहाटे 3 वाजता डाउन मार्गावर सीएसएमटी-कल्याण, सीएसएमटी-पनवेल आणि अप मार्गावर कल्याण-सीएसएमटी, पनवेल-सीएसएमटी या मार्गावर धावणार आहेत.