Mumbai Local Viral Video : मुंबईच्या झगमग दुनियेत लाखो लोक आपल्या उराशी स्वप्न बाळगून इथे येतात. मुंबईतील लोकल ही त्यांची जीवनवाहिनी...ऑफिस गाठण्यासाठी किंवा कामानिमित्त कुठेही जाण्यासाठी लोकलची ही लाइफलाइन सोबत असते. या लोकलमधील अनेक व्हिडीओ सेकंद सेकंदाला सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ इंटरनेटवर ट्रेंडिंगमध्ये असतात. असाच एक व्हिडीओ आहे जो सोशल मीडियावर पोस्ट केल्यापासून आतापर्यंत त्याला 85 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. (mumbai viral video)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरील चल मुंबई या अकाऊंटवर मुंबई लोकलचा एक व्हिडीओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरला आहे. या व्हिडीओमध्ये महिलांच्या प्रवासावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. मुंबई लोकल ट्रेनमधील महिला डब्ब्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी हळदी कुंकू तर कधी कोणाची बर्थडे पार्टी, भाजी निवडताना महिलांचा व्हिडीओही मध्यंतरी ट्रेंडिंगमध्ये होतात. (Mumbai local train women traveling risk life viral video 85 million views Trending Video on Internet)
खरं तर महिला डब्ब्यातील सीटवरुन महिलांची हाणामारीचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. तूतूमैमै वरुन सुरु होणारी ही वादावादी हातापायीवर जाते. मुंबई लोकल ट्रेनची दुनियाच काही और असते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये महिलेचा रोजचा जीवघेणा प्रवासावर लक्षकेंद्रत केलं आहे.
या व्हिडीओवर वेगवेगळे कंमेंट्स येतं आहेत, काही यूजर्सला हेच मुंबईच स्पिरीट वाटतं आहे, तर काही जणांना जगण्यासाठी संघर्ष पाहून आश्चर्य वाटतं आहेत. तर ''जगण्यासाठी ही लोक जे संघर्ष करतात तरीही आनंदी जगतात, म्हणून त्यांना सलाम'' अशीही प्रतिक्रिया एका युजर्सने दिली आहे.
तर एका युजर्सने महिलांच्या पगारावर लक्ष वेधलं आहे. ''एवढ्या संघर्षानंतरही महिलांना तुंटपुज पगार मिळतो, त्यावर म्हणतात की, त्या पगार मिळण्याइतकं कठोर परीश्रम करत नाहीत.'' तर एका मुंबईकर म्हणाला की ''मी हा संघर्ष गेल्या 5 वर्षांपासून करत आहे. हे आमच्यासाठी रोजच आहे. ''
प्रत्येक मुंबईकर या व्हिडीओशी सहज एकरुप होत आहेत. कारण ते लोकलमधून प्रवास करताना असा प्रवास करतात. मुंबईकरांचा हा प्रवास प्रत्येकाला आश्चर्यचकित करतो. मुंबईच्या बाहेरुन आलेल्या लोकांना मुंबईचा हा प्रवास अतिशय धोकादायक आणि अशक्य वाटतो. त्यांना लोकलमधून प्रवास करताना वेगवेगळे अनुभव येतात.