मनसे कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांकडून मारहाण?

विक्रोळीमधील मनसेच्या कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 27, 2017, 08:30 AM IST
मनसे कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांकडून मारहाण? title=

मुंबई : विक्रोळीमधील मनसेच्या कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे.

हल्ल्यात मनसे कार्यकर्ते जखमी

या हल्ल्यात विक्रोळी मनसेचे उपविभाग प्रमुख विश्वजित ढोलम हे जखमी झाले असून त्यांना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

हल्लेखोर हे फेरीवाले असल्याचा आरोप

दुकानदारांना मराठी पाट्या लावण्याचा इशारा देणारी पत्रके वाटत असताना त्यांना मारहाण करण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे. हल्लेखोर हे फेरीवाले असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे.

अमित ठाकरेंनी घेतली जखमी कार्यकर्त्यांची भेट

या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी रात्री उशिरा रुग्णालयात जखमी कार्यकर्त्यांची विचारपूस केली.

फेरीवाल्यांना हटवण्याच्या मुद्दयावरुन मनसे आणि फेरीवाले यांच्यात सुरु असलेल्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

काही दिवसांपूर्वी मालाड परिसरात मनसे विभाग प्रमुखाला फेरीवाल्यांनी मारहाण करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता पून्हा एकदा मनसे कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली आहे.