मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना मिळालेला जामीन का रद्द करु नये, अशी विचारणा सत्र न्यायालयानं केली आहे. राणा दाम्पत्याला कोर्टानं नोटीस बजावलीय. त्यावर उत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेत. राणा दाम्पत्यानं मीडियाशी बोलू नये, याच अटीशर्तीवर राणांना जामीन मंजूर करण्यात आला होता. तरीही नवनीत राणा यांनी रुग्णालयातून बाहेर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांना आव्हान दिलं होतं. त्यानंतर जामीन रद्द करण्याचा अर्ज सरकारतर्फे कोर्टात दाखल करण्यात आला आहे.
राणांनी रुग्णालयातून बाहेर येताच मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं. 'मी उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की तुमच्यात दम असेल तर त्यांनी लोकांमध्ये यावं आणि लोकांमधून निवडून येऊन दाखवा' उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात उभे राहतील तेथे मी उभी राहून जिंकून दाखवते, असंही नवनीत राणा यांनी म्हटलं होतं.
जामीनावर सुटका झालेल्या नवनीत यांना मीडियाशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा शाधला. त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी चॅलेंज दिले. त्यामुळे त्यांनी न्यायालयाच्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन केलं आहे का हे तपासलं जात असल्याचं विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे, राणा दाम्पत्याच्या अडचणीत आणखी वाढ झालीय. रवि राणाच्या खारमधल्या घरामधल्या अवैध बांधकामप्रकरणी महापालिका लवकरच राणांना नोटीस बजावणार आहे. खारमधल्या घरात मुंबई महापालिकेला अवैध बांधकाम आढळलंय. आज मुंबई महापालिकेच्या एच पश्चिम विभागाने राणांच्या घराची तपासणी केली. आता त्य़ांना लवकरच नोटीस पाठवण्यात येणार आहे.
नवनीत राणांकडून अजितदादांचं कौतुक
खासदार नवनीत राणां यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना अजितदादा आणि फडणवीसांचं कौतुक केलं. मुख्यमंत्र्यांपेक्षा अजितदादाच जास्त काम करतात, त्यांनी जेलमधील अन्यायाबाबत चौकशी करावी. तसंच राज्य कसं चालवायचं ते उद्धव ठाकरेंनी फडणवीसांकडून शिकावं असाही टोला लगावला...
दरम्यान, नवनीत राणा गृहमंत्री अमित शाह आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची संध्याकाळी भेट घेणार आहेत. राणा दिल्लीत दाखल झाल्या आहेत. मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांचे पाप धुतले जाणार असं नाही. पापाचे प्रायश्चित करावेच लागेल, असं राणांनी म्हटलंय