प्रोजेरियाग्रस्त श्रेयश बारमाते नैराश्येत असलेल्यांना देतोय उमेद

अमिताभ यांच्या 'पा' सिनेमानंतर प्रोजेरिया आजाराबद्दल सर्वांना माहिती झाली.

Updated: Oct 1, 2019, 11:20 AM IST

प्रविण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई : अमिताभ यांच्या 'पा' सिनेमानंतर प्रोजेरिया आजाराबद्दल सर्वांना माहिती झाली. या आजाराने ग्रस्त असलेल्यांचे वयोमान १४ वर्षांचे असते असे म्हटले जाते. या आजारात वय झपाट्याने वाढते, वाढ खुंटते, त्वचा शुष्क होते, कंबर सरकते अशी लक्षणं जाणवू लागतात. त्यामुळे अगदी चिमुरड्या वयातही पीडित वयस्करांप्रमाणे दिसू लागतात. 

१३ वर्षांचा श्रेयश बारमाते जबलपूरमध्ये राहतो...त्याचं आजोळ नाशिकंच असल्याने तो मराठी खूप चांगल बोलतो..वयाच्या पाचव्या वर्षापासून तो शास्त्रीय संगीत शिकतोय...यासोबतच स्वीमींग, ड्रायव्हींग, डान्सिंग यातही तो निपुण आहे. गेल्यावर्षी एका रिेएलिटी शो मुळे तो चर्चेत आला होता. आता काही दिवसांसाठी मुंबईत आलाय. 

आपल्या आजाराबद्दल त्याला पुरेपूर जाणिव आहे. त्यामुळे उगीच सहानभुती घेण्याच्या मागे तो पडत नाही. पण त्याच्या अंगी असलेल्या नाना गुणांमुळे समोरचा व्यक्ती त्याचा फॅन होऊन जातो. आयुष्य जगण्याची कला त्याला चांगली अवगत झालीय त्यामुळे अनेक सुखसोयी असूनही नैराश्येत असलेल्यांसाठी श्रेयश प्रेरणादायी ठरतो.