पाच दिवसांसाठी ट्रॅफिक ब्लॉक! हार्बर रेल्वेने प्रवास करताय, वेळापत्रक पाहा

Harbour Line Traffic Block : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर तांत्रिक कारणासाठी 1 ऑक्टोबरला 38 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. आता पुन्हा एकदा हार्बर मार्गावरील पनवेल स्थानकात मध्यरात्री ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्यरेल्वेने वेळापत्रक जारी केलं आहे. 

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Oct 5, 2023, 09:11 PM IST
पाच दिवसांसाठी ट्रॅफिक ब्लॉक! हार्बर रेल्वेने प्रवास करताय, वेळापत्रक पाहा title=

Harbour Line Traffic Block :  मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून हार्बर मार्गावर (Harbour Line) 38 तासांचा मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात आला होता. त्यानंतर आता पाच दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने सुधारित वेळापत्रक जारी केलं आहे.  

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी अप आणि डाउन 2 नवीन लाईन्सच्या बांधकामासाठी उपनगरीय यार्ड रीमॉडेलिंग कामासाठी मध्य रेल्वेने शनिवार आणि रविवारच्या सुट्टीत पनवेल इथं मेगाब्लॉक घेतला.  त्यानंतर पनवेल ईएमयू (EMU) स्टेबलिंग साईडिंग इथं पोस्ट कमिशनिंग काम म्हणून, पाच  ऑक्टोबरपासून  मध्यरात्री ब्लॉक चालवण्यात आला होता आणि उर्वरित साइडिंग सुरू करण्यासाठी, 5/6  ऑक्टोबर  (गुरु/शुक्र) ते 8/9. ऑक्टोबरदरम्यान (रवि/सोम)  पनवेल इथं मध्यरात्री 1.15 ते 4.45 वाजेपर्यंत मध्यरात्री ब्लॉक चालवला जाणार आहे. 

ब्लॉक कालावधीत 5/6  ऑक्टोबर  (गुरु/शुक्र) आणि 8/9. ऑक्टोबरदरम्यान मध्यरात्री 1.15 ते 4.45 वाजेपर्यंत वाजेपर्यंत या तीन दिवसांसाठी बेलापूर आणि पनवेल स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा रद्द राहतील.

- दि. ५/६.१०.२०२३ (गुरु/शुक्र) ते ८/९.१०.२०२३ (रवि/सोम) दरम्यान डाऊन हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.१४ वाजता सुटेल आणि ००.३४ वाजता पनवेलला पोहोचेल.
- दि. ५/६.१०.२०२३ (गुरु/शुक्र) ते ८/९.१०.२०२३ (रवि/सोम) पर्यंत डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल ठाणे येथून २३.३२ वाजता सुटेल आणि ००.२४ वाजता पनवेलला पोहोचेल.
- अप हार्बर मार्गावर पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल ब्लॉक कालावधीत वेळापत्रकानुसार असेल.
- दि. ५/६.१०.२०२३ (गुरु/शुक्र) ते ८/९.१०.२०२३ (रवि/सोम) पर्यंत अप ट्रान्स-हार्बर मार्गावर पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल २२.१५ वाजता पनवेलहून सुटेल आणि २३.०७ वाजता ठाण्याला पोहोचेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेलसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार असेल.
- दि. ५/६.१०.२०२३ (गुरु/शुक्र) ते ८/९.१०.२०२३ (रवि/सोम) पर्यंत ठाण्याहून पनवेलसाठी ब्लॉक पुर्ण झाल्यानंतर पहिली लोकल ट्रेन ०६.२० वाजता ठाण्याहून सुटेल आणि ०७.१२ वाजता पनवेलला पोहोचेल.
 - दि. ५/६.१०.२०२३ (गुरु/शुक्र) ते ८/९.१०.२०२३ (रवि/सोम) पर्यंत पनवेलहून अप हार्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल ट्रेन ०५.१७ वाजता सुटेल आणि ०६.३६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला पोहोचेल.
- ब्लॉकनंतर पनवेलहून अप ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाण्याच्या दिशेने दि. ५/६.१०.२०२३ (गुरु/शुक्र) ते ८/९.१०.२०२३ (रवि/सोम) पर्यंत पहिली लोकल ट्रेन ०५.४४ वाजता पनवेलहून सुटेल आणि ०६.३८ वाजता ठाण्याला पोहोचेल.