मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळमध्ये स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक व्यक्ती एक पदाच्या धोरणानुसार चंद्रकांत पाटील यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपद आशिष शेलार यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्षपदी शेलारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे शेलार यांचं मंत्रिपदाच्या शर्यतीतून नाव मागे पडल्याचं दिसतं आहे.
मुंबईतील भाजपचे मोठे नेते आणि आमदार आशिष शेलार यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी आहे. पण त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं जाणार आहे. त्यामुळे आता भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार आहे. तब्बल सव्वा महिन्यानंतर हा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने टीका होत होती. पण अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या व्यक्तींना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणार आहे. पण आशिष शेलार यांचं नाव यामध्ये नसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारात विधानपरिषदेच्या कोणत्याही आमदारांना मंत्रिपद मिळणार नाहीये. शपथविधीसाठी राजभवनावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. उद्या सकाळी 11 वाजता राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये शपथविधी होणार आहे.
शिंदे गटाची नावे
१. दीपक केसरकर - सिंदुधुर्ग
२. दादा भुसे - मालेगाव
३. उदय सामंत - रत्नागिरी
४. अब्दुल सत्तार - संभाजीनगर
५. गुलाबराव पाटील - जळगाव
६. संदीपान भुमरे - संभाजीनगर
७. शंभुराज देसाई - सातारा
८. संजय शिरसाट - संभाजीनगर
९.तानाजी सावंत - उस्मानाबाद
१०. बच्चू कडू - अमरावती
भाजपची यादी
१) चंद्रकांत दादा पाटील
२) राधा कृष्ण विखे पाटील
३) सुधीर मुनंगटीवार
४) गिरिष महाजन
५) सुरेश खाडे
६) अतुल सावे
७) मंगलप्रभात लोढा
८) रवींद्र चव्हाण
९ ) विजयकुमार गावित