मुंबई: पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतील (पीएमसी) घोटाळाप्रकरणी गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेने पहिली कारवाई केली. हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे (एचडीआयएल) संचालक सारंग वाधवा आणि राकेश वाधवा यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून आर्थिक गुन्हे शाखेकडून या दोघांची चौकशी सुरु होती. मात्र, चौकशीत सहकार्य करत नसल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने आज या दोघांना अटक केली. तसेच या दोघांची ३५०० कोटी रुपयांची मालमत्ताही गोठवण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच पीएमसी बँकेकडून थकित कर्जाबद्दलची खोटी माहिती रिझर्व्ह बँकेला देण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता. विशेष म्हणजे बँकेने दिलेल्या एकूण कर्जापैकी ७५ टक्के कर्ज हे एकट्या एचडीआयएल कंपनीलाच देण्यात आले होते.
PMC Bank matter: Housing Development Infrastructure Limited (HDIL) Directors, Sarang Wadhawan and Rakesh Wadhwan, accused of loan default, have been arrested by Economic Offence Wing. More details awaited. pic.twitter.com/JpgA3WrTv7
— ANI (@ANI) October 3, 2019
हा गैरव्यवहार समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेकडून पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध लादण्यात आले होते. त्यानुसार पीएमसीला रिझव्र्ह बँकेच्या परवानगीशिवाय कर्ज वितरणाला, नवीन गुंतवणूक करण्याला किंवा निधी मिळवून दायित्व वाढविता येणार नाही. त्याचप्रमाणे नव्याने ठेवी स्वीकारण्याला, तसेच ठेव वठविणे, देणी चुकती करण्याला आणि आपल्या कोणत्याही स्थावर मालमत्ता व संपत्तीची विक्री, हस्तांतरण किंवा अन्य मार्गाने विल्हेवाटीवर बंदी आली आहे.