'आमचे पैसे परत द्या' मागणी करत पीएमसी बँक खातेदारांचा गोंधळ

पीएमसी बँकेच्या खातेदारांनी जोरदार गोंधळ घातला. 

Updated: Oct 10, 2019, 05:20 PM IST
'आमचे पैसे परत द्या' मागणी करत पीएमसी बँक खातेदारांचा गोंधळ title=

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या मुंबईतल्या पत्रकार परिषदेपूर्वी पीएमसी बँकेच्या खातेदारांनी जोरदार गोंधळ घातला. आमचे पैसे परत करा, अशी मागणी पीएमसी बॅंक खातेदारांनी यावेळी केली. त्यावेळी निर्मला सीतारमण गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याबाबत आरबीआय गव्हर्नरांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले. 

पीएमसी बॅंक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर बॅंकेतून पैसे काढण्यासाठी निर्बंध घातले गेले. त्यामुळे सामान्य लोकांना याचा त्रास सहन करावा लागला आहे. बँकेत असलेले आपले पैसे परत करण्याची मागणी खातेधारकांनी अर्थमंत्र्यांसमोर केली.  पीएसी बँक खातेधारकांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी जोरदार गोंधळ घातला. पत्रकार परिषद सुरू असताना खातेधारकांनी बाहेर जोरदार निदर्शनेही केली. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी निदर्शकांना भाजप कार्यलयात बोलावले. मात्र. त्यांनी रोष व्यक्त केला. आरबीआय गव्हर्नारांना भेटून गुंतवणूदारांच्या भावना पोहोचवणार असल्याचे आश्वासन सीताराण यांनी दिले आहे.