Railway Megablock : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडण्याआधी वाचा मेगाब्लॉकचं वेळापत्रक!

Mega Block 18 September 2022 : विकेंडला बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांनो आज घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक नक्की तपासा.   

Updated: Sep 18, 2022, 07:22 AM IST
Railway Megablock : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडण्याआधी वाचा मेगाब्लॉकचं वेळापत्रक!   title=

Mumbai Local Mega Block :  सिग्नल यंत्रणा आणि रुळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी मध्य रेल्वे (Central Railway), पश्चिम रेल्वे (Western Railway) आणि हार्बर मार्गावरील (Harbour Railway) लोकल वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक नक्की पाहा. (railway megablock 18 september 2022 on central line   )

आज रविवारी 18 सप्टेंबर रोजी मध्य (central line) आणि ट्रान्स हार्बरवर (transharbour line) मेगाब्लॉक आहे, तर हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेगाब्लॉक नसल्याने दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आलेला नाही. याबाबतची अधिक माहिती जाणून घ्या...
  
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (csmt) येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद ( down fast) मार्गावर वळवण्यात येतील. या ट्रे्न्स (train) भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे पुन्हा डाउन मार्गावर वळवल्या जातील.

तर घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 पर्यंत  सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद (Up fast) मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.

ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत

ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.07 वाजेपर्यंत  वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर (transharbour) मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरुळ/पनवेल येथून सकाळी 10.25 ते सायंकाळी 4.09 वाजेपर्यंत ठाणे करीता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

या ब्लॉकदरम्यान ट्रान्सहार्बर (transharbour) मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत हार्बर/मेन मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी असेल.