हे कारण होते म्हणून वाचली ओखीच्या तडाख्यातून मुंबई

  मुंबईवरील ओखी वादळाचा धोका टळला असून आता मच्छीमारांना मासेमारी करण्यासाठी समुद्रात आता जाता येणार आहे.  दरम्यान, मुंबईतील वातावरण विपरीत असते तर मुंबईत ओखी वादळाने हाहाकार माजवला असता, असे कुलाबा वेधशाळेने स्पष्ट केले आहे. 

Updated: Dec 6, 2017, 08:46 PM IST
हे कारण होते म्हणून वाचली ओखीच्या तडाख्यातून मुंबई  title=

सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई :  मुंबईवरील ओखी वादळाचा धोका टळला असून आता मच्छीमारांना मासेमारी करण्यासाठी समुद्रात आता जाता येणार आहे.  दरम्यान, मुंबईतील वातावरण विपरीत असते तर मुंबईत ओखी वादळाने हाहाकार माजवला असता, असे कुलाबा वेधशाळेने स्पष्ट केले आहे. 

मुंबईवरील धोका टळल्याने आता बोटीद्वारे समुद्र वाहतूक ही पुन्हा सुरू करता येणार आहे.   

अरबी समुद्राचे तापमान २७.५ अंश सेल्सिअस पेक्षा कमी असल्याने चक्रीवादळाचे रूपांतर कमी दाबाच्या पट्टात झाले आणि धोका टळला. समुद्रातील तापमान २७ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असते तर चक्रीवादळ अधिक गतिमान होत मुंबईच्या किनाऱ्याला धडकले असते आणि नुकसान जास्त झाले असते 

गुजरातही वाचणार... 

गुजरात दिशेने कमी दाबाचा पट्टा तयार झाला पण तिथ ही फारसे नुकसान होणार नाही, असे  कुलाबा वेधशाळेने स्पष्ट केले आहे. 

येत्या दोन दिवसात मात्र कोकण, मुंबई आणि मराठवाडा काही भागात ढगाळ वातावरण सोबत हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.