मुंबई : युवासेना प्रमुख यांच्या सोबतीने क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने आज वांद्रे येथील बॅन्ड स्टॅन्ड भागाची साफसफाई केली.
ज्या भूमीला आपणा 'धरणीमाता' म्हणतो त्याच भूमीवर लोकं इतका कचरा टाकतात. हे पाहून वाईट वाटतं ' अशी भावना सचिन तेंडुलकर याने व्यक्त केली आहे. तसेच लोकांनी बाहेर पडल्यावर कचराकुंड्याचा वापर करावा. त्यामध्ये कचरा टाकण्याचे आव्हान केले आहे. कचरा साफ करण्याला आपण 'कचरेवाला' म्हणतो. पण वास्तवात आपण कचरा करतो तो तर सफाईवाला आहे. असे सांगत आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहनही सचिनने केले आहे.
We each have to do our bit to keep #IndiaClean. So, pick a group of friends, a street, and together let’s #CleanUp India. #SwachhataHiSeva pic.twitter.com/k8Z7o8Faca
— sachin tendulkar (@sachin_rt) September 26, 2017
सचिन तेंडुलकर सोबत त्याचा मुलगा अर्जुन आणि आदित्य ठाकरे यांनीदेखील बॅन्ड स्टॅन्ड परिसराची साफसफाई केली.
साफ करत असताना पुन्हा एकदा जाणवले, की प्लॅस्टिक आणि थर्माकॉल यांनीच मुंबईला सर्वात जास्त त्रास होतो. pic.twitter.com/2Mkkl93yEg
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 26, 2017
ट्विटरची मदत घेत सचिन तेंडुलकरने नागरिकांना त्यांच्या मित्रांसोबत एखादा परिसर ठरवून तेथे साफसफाई करण्याचे आवाहन केले आहे.