मुंबई : भायखळा तुरुंग आहे की लैंगिक अत्याचाराची छळ छावणी आहे असा प्रश्न आता पडायला लागलाय....मंजुला शेट्ये हत्येप्रकरणी रोज नवीन धक्कादायक माहिती पुढे येतेय.
मंजुला शेट्येची हत्या जेलमध्ये वर्चस्वाच्या वादातून झाल्याचा दावा इंद्राणी मुखर्जीनं केलाय. इंद्राणी मुखर्जी ही तिचीच मुलगी शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी असून भायखळा तुरुंगात न्यायलयीन कोठडीत भोगतेय.
मारहाण करते वेळी महिला पोलीसांना मंजुलाच्या गुप्तांगावर रॉडनं मारहाण केली. मंजुलाची हत्या केल्यावर तुरुंगातला वीज पुरवठा खंडीत करून इतर महिला कैद्यांवर लाठीमार करण्यात आल्याचंही इंद्राणीनं कोर्टात सांगितलंय.
इंद्राणीनं यावेळी तिच्या शरीरावर मारहाणीचे व्रणही दाखवले. त्यानंतर कोर्टानं तिच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले आहेत. मंजुला शेट्ये हत्याप्रकरणी भायखळा जेलच्या अधीक्षक मनिष पोखरकर यांच्यासह 6 पोलीस कर्मचाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय़.. पण अद्याप कुणालाच अटक करण्यात आलेली नाही.
शुक्रवारी रात्री जी घटना घडली ती मी कधीच विसरु शकणार नाही. ती रात्र आठवली तरी अंगावर काटा येतो. ही घटना घडण्या ४-५ दिवसांपासूनच मंजुला शेट्येला अनेकदा जेलच्या पोलिसांनी मारहाण केली होती. खरं तर मंजुला त्याच्या टार्गेटवरच होती कारण जेल मध्ये तिचे वर्चस्व वाढत होते.
कैदी तिचे ऐकायचे त्यामुळे एक प्रकारे जेलमध्ये मंजुला लोकप्रिय होती. हाच राग मनात धरुन मंजुला शेट्येला २ अंडी आणि ५ पावाचा हिशेब लागत नसल्याचे कारण पुढे करत बेदम मारहाण करायला सुरुवात केली गेली. तिझ्या ओरडण्याच्या आवाजाने संपूर्ण जेल हादरले होते. पण निर्दयी पोलीस तिला मारतच होते. तिचे डोके कित्येक वेळा भिंतीवर आदळले गेले. मिळेल्या त्या वस्तूने मंजुलाला पोलीस मारत होते.
मी पाहिलं की मंजुळा शेट्येला तिच्या गळ्याला ओढणीनं आवळून ओढले जातं होतं. लोखंडी रॉडने तिला अमानुष मारहाण केली जात होती. एवढच नाही तर तिझ्या गुप्तांगात कधी लोखंडी रॉड तर कधी काठी घातली जात होती. काही काळाने हा सर्व प्रकार शांत झाला. सकाळी आम्ही जेव्हा मंजुला बाबत विचारपूस केली तेव्हा तिझा मृत्यू झाल्याचे आम्हाला कळाले.
वा-या सारखी ही बातमी जेल मध्ये पसरताच इतर महिला कैद्यांनी जेल मध्येच आरडाओरडा सुरु केला. हे पाहता जेल मधील सर्व लाईट्स बंद केल्या गेल्या आणि महिला पोलिसांसह पुरुष पोलीसांनीही महिला कैद्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे घाबरुन सर्व महिला कैदी जेलच्या छतावर गेल्या आणि त्यांनी मदत मागण्यास सुरुवात केली. या दरम्यान मलाही पोलीसांनी डोक्यात, हातापायवर लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली आणि जर घडलेल्या प्रकारा बद्दल कुठे वाच्यता केली तर लैंगिक अत्याचार करण्याची धमकी मला जेलमधील पोलिसांनी दिली.
घडलेला प्रकार हा जेलमधील पोलीसांच्या क्रुरतेचा परमोच्च होता. त्यामुळे जेव्हा माझे वकील मला भेटण्यास आले तेव्हा त्यांना मी हा प्रकार सांगतिला आणि आज मला कोर्टात हजर केलं. पण, जो कृत्य जेल पोलिसांनी मंजुला शेट्ये सोबत केलं ते क्रुरतेचा कळस होता. मला धमकावलं गेलय पण मी माझ्या मतावर ठाम आहे.