मुंबई : मीरा-भाईंदर येथे कोरोना विषाणूची लागण झालेले शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद आंमगावकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हरिश्चंद आंमगावर यांना आठवड्यापूर्वी कोरोना विषाणूची बाधा झाली होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Breaking News । मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाची लागण झालेले शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद्र आंमगावकर यांचे निधन । आठवड्यापूर्वी नगरसेवक हरिश्चंद्र आंमगावकर यांना कोरोनाची लागण झाली होती. । त्यांच्यावर उपचार सुरु होते @ashish_jadhao #Coronavirus #CoronaVirusUpdates https://t.co/kpo9phlA1j
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 9, 2020
आठवड्यापूर्वी आंमगावकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांना ठाणे येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांवर उपचार सुरु होते. दरम्यान त्यांच्या पत्नीला नुकताच डिस्चार्ज देण्यात आला होता. तरर भाऊ आणि आई हे अद्यापही वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
हरिश्चंद्र आंमगावकर हे मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये दोन टर्म नगरसेवक होते. तर या अगोदर त्यांनी मीरा भाईंदर महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष पद देखील भूषवले होते. सध्या ते महानगरपालिका शिवसेनेचे गटनेते म्हणून होते. तर आमदार प्रताप सरनाईक यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख जात होते.