धक्कादायक ! वापरलेल हातमोजे धुवून पुन्हा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नवी मुंबई क्राईम ब्रांच पोलिसांची मोठी कारवाई

Updated: Aug 19, 2020, 09:53 PM IST
धक्कादायक ! वापरलेल हातमोजे धुवून पुन्हा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नवी मुंबई : एकीकडे कोरोनाचं संकट कायम असताना जनजीवन विस्कळीत झालं आहे. देशात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. पण दुसरीकडे काही समाजकंटक याला फायदा म्हणून पाहत आहेत. नवी मुंबईत असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवी मुंबई क्राईम ब्रांच पोलिसांनी डॉक्टरांनी वापरलेल हातमोजे धुवून पुन्हा वापरात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

एमआयडीसी येथे छापा टाकून पोलिसांनी तब्बल 263 गोणी वापरलेले हातमोजे जप्त केले आहेत. हातमोजे विकणाऱ्या प्रशांत सुर्वेला पोलिसांनी अटक करत केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

एकीकडे लोकं आपली काळजी घेत आहेत. पण दुसकीकडे काही जण इतरांच्या आरोग्याशी खेळत आहेत. नवी मुंबईतील हा प्रकार धक्कादायक आहे. पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.